News Flash

होय.. मी तुकाराम मुंढेंच्या पाठिशी : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं स्पष्ट

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाठिशी तुम्ही आहात का? असा प्रश्न जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी त्याचं उत्तर हो असं दिलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. याच मुलाखतीत संजय राऊत यांनी तुकाराम मुंढे नागपूरमध्ये लावत असलेल्या शिस्तीबाबत प्रश्न विचारला तेव्हा शिस्तप्रिय तुकाराम मुंढेंच्या पाठिशी मी आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

” नागपूर महापालिका विरुद्ध तुकाराम मुंढे यांचा वाद सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. एखादा अधिकारी कठोर आणि कडक शिस्त पालन करणारा असू शकतो. तुकाराम मुंढे यांनी लोकहिताचे निर्णय घेतले. नागपूरमध्ये त्यांनी एक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घेतलेले निर्णय जर काही लोकांना पटत नसतील त्यांनी हे लक्षात घ्यावं की तिथे आता निवडणुकीचा जमाना नाही. मतदार वाचले तर मतदान होईल हे लक्षात घ्यावं. अशा सगळ्या वातावरणात तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्याने जर एखादी गोष्ट अमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्या पाठिशी उभं राहिलंच पाहिजे. आततायीपणा कुणीही करु नये. पण एक चांगली शिस्त जर लावली जात असेल आणि जनतेचं हित त्यामध्ये साधलं जात असेल तर मी तुकाराम मुंढेंच्या पाठिशी आहे.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

मध्यतंरीच्या काळात नागपूरच्या महापौरांनीही नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर टीका केली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या निर्णयांबाबत नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे नगरसेवकांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेत असल्याचाही आरोप त्यांच्यावर झाला. तुकाराम मुंढे फोन उचलत नाहीत, भेटायला गेल्यास बाहेर उभं ठेवतात अशाही तक्रारी त्यांच्या संदर्भात झाल्या होत्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर तुकाराम मुंढे यांची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयात पत्र पाठवून केली होती. याबाबत सामनाच्या मुलाखतीत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की मी शिस्तप्रिय तुकाराम मुंढेच्या पाठिशी उभा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 9:16 am

Web Title: yes i support tukaram mundhe says cm uddhav thackeray scj 81
टॅग : Uddhav Thackeray
Next Stories
1 “संयम हवा की यम हे तुम्ही ठरवा”; लॉकडाउनवरुन टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा टोला
2 “उद्योगधंद्यांबद्दल सरकारी धोरणे योग्य नसतील तर…”; मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा निशाणा 
3 “तेव्हा मोदींनी सांगितलं होतं की, अशी योजना जाहीर करु नका ज्यामुळे…”; उद्धव ठाकरेंचा खुलासा
Just Now!
X