News Flash

“हा देश तुम्हाला माफ करणार नाही”, Toolkit प्रकरणावरून योगगुरू रामदेव बाबांनी साधला निशाणा

काँग्रेसच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या टूलकिटवरून योगगुरू रामदेव बाबा यांनी थेट हिंदुत्वाच्या मुद्द्याला धरून टीका केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर देशात सध्या असलेल्या करोना व्हायरसला मोदी व्हायरल किंवा इंडियन व्हायरस असं म्हणण्याचं आवाहन करणारं एक टूलकिट काँग्रेसच्या नावाने व्हायरल होत आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी हे टूलकिट ट्विटरवरून शेअर करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यानंतर आता योगगुरू रामदेवबाबा यांनी देखील टूलकिट प्रकरणावरून काँग्रेसचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. “माझी हे करणाऱ्या लोकांना विनंती आहे की ते राजकारण करू शकतात, पण हिंदूंचा अपमान करू नका. हा देश तुम्हाला माफ करणार नाही”, असं रामदेव बाबा म्हणाले आहेत. काँग्रेसकडून हे ट्वीट बनावट असून त्यासंदर्भात तक्रार दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, भाजपाकडून काँग्रेसवर सातत्याने यासंदर्भात टीका करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता रामदेव बाबा यांनी देखील निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाले रामदेव बाबा?

एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, रामदेव बाबा यांनी या टूलकिटचा संदर्भ थेट हिंदुत्वाशी जोडला आहे. “कुंभमेळा आणि हिंदुत्वाचा टूलकिटच्या माध्यमातून अपमान करणं हा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कट असून तो एक अपराध आहे. माझी अशा लोकांना विनंती आहे की ते राजकारण करू शकतात, पण हिंदूंचा अपमान करू नका. हा देश तुम्हाला माफ करणार नाही. माझं लोकांना आवाहन आहे की त्यांनी अशा शक्तींवर बहिष्कार टाकावा आणि विरोध करावा”, असं रामदेव बाबा म्हणाले आहेत.

 

टूलकिट प्रकरणावरून नेमकं काय काय घडलंय?

सर्वात आधी भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी हे कथित टूलकिट शेअर करत आरोप केले. त्यावर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर देत टूलकिट बनावट असल्याची बाजू मांडली. त्याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले. राज्यात भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी हे टूलकिट शेअर करत काँग्रेसवर निशाणा साधला.

 

त्यापाठोपाठ काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अतुल भातखळकर यांच्या टीकेला सडेतोड उत्तर देत त्यांच्या ट्वीटचा समाचार घेतला.

 

Congress Toolkit : काँग्रेसकडून प्रत्येक वेळी भारतविरोधी भूमिका का घेतली जाते? – देवेंद्र फडणवीस

रात्री उशिरा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट काँग्रेस पक्षाला लक्ष्य करत “नेहमीच भारतविरोधी भूमिका का?” असा सवाल केला.

 

त्यामुळे या टूलकिट प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 3:34 pm

Web Title: yog guru ramdev baba slams congress toolkit regarding hinduism pmw 88
टॅग : Maharashtra Politics
Next Stories
1 वर्धा : लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल; प्रशासनाचा शेतकऱ्यांना दिलासा
2 “अनिल परब यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”, किरीट सोमय्यांनी केला गंभीर आरोप!
3 मोदी सरकार ४०० हून अधिक जागा जिंकण्याच्या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर राऊतांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Just Now!
X