News Flash

योग व निसर्गोपचार विधेयक विधान परिषदेत मंजूर

तावडे यांनी विधानपरिषदेत मांडलेले महाराष्ट्र योग व निसर्गोपचार विधेयक संमत करण्यात आले.

विधान भवन

योग आणि निसर्गोपचार यांच्या विकासाची संधी निर्माण करतानाच या व्यवसायाला कायदेशीर मान्यता देणे आवश्यक आहे. योग हा विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य झाला असून, या माध्यमातून रोजगार निर्माण होऊ शकेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधान परिषदेत व्यक्त केला.
तावडे यांनी विधानपरिषदेत मांडलेले महाराष्ट्र योग व निसर्गोपचार विधेयक संमत करण्यात आले. विधानसभेमध्ये मंगळवारी या विधेयकाला मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे योग व निसर्गोपचार पद्धतीला कायदेशीर मान्यता मिळणार आहे.
योग व निसर्गोपचार ही स्वास्थ्य व रोगमुक्तीची प्राचीन शास्त्रे आहेत. आज ही शास्त्रे जगभरात लोकप्रिय आहेत. या शास्त्रांमधील अध्यापन व त्यांचा व्यवसाय यांचे विनियमन करुन त्यांचा विकास करणे, हा या विधेयकाचा प्रमुख उद्देश आहे असे विनोद तावडे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2016 6:58 pm

Web Title: yoga and naturopathy bill passed in legislative council
टॅग : Vinod Tawde,Yoga
Next Stories
1 तृप्ती देसाईंना कोल्हापूरमध्ये प्रवेशापासून रोखले, पोलिसांनी घेतले ताब्यात
2 वनक्षेत्र वाढवण्यासाठी ६८८१ कोटी खर्च करूनही प्रत्यक्षात घट, ‘कॅग’चे ताशेरे
3 मालेगाव स्फोट : नऊ मुस्लिम आरोपींच्या सुटकेवरून ‘एनआयए’चे घुमजाव
Just Now!
X