18 April 2019

News Flash

पंधरा लाख छात्रांचा ‘योग’ लिम्का बुकमध्ये झळकणार

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (२१ जून) ५२ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियनचे चार जिल्ह्यांतील सुमारे ३ हजार छात्र विविध १३ ठिकाणी योग करणार आहेत. देशभरातील १५ लाख छात्र

| June 20, 2015 01:20 am

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (२१ जून) ५२ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियनचे चार जिल्ह्यांतील सुमारे ३ हजार छात्र विविध १३ ठिकाणी योग करणार आहेत. देशभरातील १५ लाख छात्र एकाच वेळी योग करतील. याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होईल, अशी तयारी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी योग दिन उत्साहात साजरा करण्याची तयारी केली आहे. दि. १ मे पासून त्यासाठी प्रशिक्षणही सुरू करण्यात आले. शासकीय पातळीवरून सर्व संबंधित विभागांना सूचना जारी करण्यात आल्या असून, योग दिन यशस्वी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली आहे. शहर व परिसरातील काही छोटय़ा-मोठय़ा शाळांनी योग दिनाची जय्यत तयारी केली आहे. राष्ट्रीय छात्रसेना आपल्या परीने योग दिन साजरा करणार आहे. नांदेडमध्ये यशवंत महाविद्यालयाच्या मदानावर सकाळी तासभर योगाचे प्रशिक्षण दिले जात आहे. पतंजली योग विद्यापीठाचे प्रा. वसंत गोरे, ढगे व सहकारी सराव करून घेत आहेत. जिल्ह्यातील छात्रसेनेचे दीड हजार विद्यार्थी, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी सहभागी होणार आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद होईल, असा विश्वास कर्नल खाजी जॉन यांनी व्यक्त केला. योग दिनात सहभागी होणाऱ्या सर्व छात्रांना टी शर्ट व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कॅप्टन डॉ. पी. आर. वेसणेकर यांची या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून नियुक्ती झाली आहे. ‘लिम्का बुक’साठी या कार्यक्रमाचे नामांकन असून संपूर्ण देशातील एकूण १५ लाख छात्र रविवारी सकाळी ७ ते ७.३५ दरम्यान एकाच वेळी योग करणार आहेत.

First Published on June 20, 2015 1:20 am

Web Title: yoga of 15 lakhs student in limca book of record
टॅग Nanded,Student