News Flash

पत्नी, सासूच्या छळास कंटाळून तरुणाची विष पिऊन आत्महत्या

पत्नी व सासूच्या जाचास कंटाळून तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याची घटना मिरजेत घडली असून या प्रकरणी सहाजणांना पोलिसांनी अटक केली आहे.

| May 22, 2014 03:32 am

पत्नी व सासूच्या जाचास कंटाळून तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याची घटना मिरजेत घडली असून या प्रकरणी सहाजणांना पोलिसांनी अटक केली आहे.
मोजम महंमद शफी मलंग हा विशाळगडचा तरुण पत्नी रमिजा हिच्या माहेरी राहण्यास होता. या दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून वादावादी कायम होत होती. दोन दिवसांपूर्वी त्याने डोक्यात फरशी मारून स्वतला जखमी केले होते. याबाबत पत्नीने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्जही दिला होता. या तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी मोजम मलंग याला काल पोलिसांनी ठाण्यात बोलावले होते. यावेळी तो विष पिऊन आला असल्याचे त्यानेच पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तो रात्री मरण पावला.
पोलिसांनी या प्रकरणी तरुणाच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार पत्नी रमिजा मलंग, सासरा आदम मुल्ला, सासू शहीदा मुल्ला, दीर यासीन मुल्ला, आजीसासू प्यारन मुल्ला आणि अन्य एक अल्पवयीन मुलगा अशा सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. गुरुवारी न्यायालयाने पत्नी, सासू, सासरा व मेहुणा या चौघांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर लहान मुलाची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे. आजीसासू प्यारन मुल्ला हिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2014 3:32 am

Web Title: young commits suicide drink poison 2
Next Stories
1 खंडणीसाठी चिमुकलीसह आठ वर्षांच्या मुलीचा खून
2 खंडणीसाठी चिमुकलीसह आठ वर्षांच्या मुलीचा खून
3 चंद्राबाबूंच्या अटक प्रवासाचे ६९ हजारांचे भाडे थकलेलेच!
Just Now!
X