28 September 2020

News Flash

गावी पाठवत नसल्याने युवतीची आत्महत्या

आसपासचे अनेक जण काम नसल्याने आपल्या मूळगावी परत जात होते

प्रतिनिधिक छायाचित्र

 

विरार : वडील गावी पाठवत नसल्याने निराश झालेल्या १९ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी संध्याकाळी वसई पुर्वेच्या वालीव येथे ही घटना घडली.

वसई पूर्वेच्या मनीचा पाडा परिसरात राहणारे राजेश रिषद सहानी हा मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होता. पण करोना काळात लागू केलेल्या टाळेबंदीमुळे त्याच्या हाताचे काम गेले आणि कुटुंबावर उपासमारीची वेळ येवू लागली. दरम्यान आसपासचे अनेक जण काम नसल्याने आपल्या मूळगावी परत जात होते. हे पाहून राजेशच्या १९ वर्षीय मुलीने सुद्धा त्यांना आपल्या गावी जाण्याचा हट्ट केला. पण आता पैसे नाहीत, पैसे आले की जाऊ असे तिला राजेश वारंवार सांगत असे. दरम्यान टाळेबंदी शिथिलता आल्यानंतर सुद्धा राजेशला कुठेच काम मिळत नसल्याने दिवसेंदिवस घराची परिस्थिती अधिक बेताची झाली होती.   घरात आलेले आर्थिक संकट आणि त्यात पैसे नसल्याने वडील गावी पाठवत नसल्याने निराश झालेल्या मुलीने आत्महत्या केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 1:01 am

Web Title: young girl commits suicide for not sending her village zws 70
Next Stories
1 विदर्भात सिंचनासाठी निधीची चणचण!
2 वेगवान वाऱ्यांसह कोकणात संततधार
3 ८३ वर्षीय आजी करोनामुक्त 
Just Now!
X