बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास गुरुवारी ग्रामीण पोलिसांनी अटक केली. ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जोडमोहा येथील १० वर्षीय बालिका  वडिलांचा डब्बा आणण्यासाठी घनश्याम ज्ञानेश्वर येरमे (३०) याच्या घरी  गेली होती. त्यावेळी घनश्यामने दरवाजाला आतून कडी लावून तिचे तोंड दाबून मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका झाल्यानंतर जखमी बालिकेने घरी घडलेली हकीकत सांगितल्यानंतर घनश्याम  येरमेविरुध्द ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करून सहायक पोलीस निरीक्षक पाचकवडे यांनी आरोपीचा शोध घेऊन गुरुवारी रात्री अटक केली. जोडमोहा परिसरातील या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला होता, परंतु पोलिसांनी आरोपीला अटक करताच हे प्रकरण निवळले.