समीर महमंद हनीफ गाडद (३८) या तरुणाचा अनतिक संबंधातून खून झाला असल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. मिरजेतील ढवळी रस्त्यावर समीर याचा मृतदेह आढळून आला. प्लॅस्टिकच्या दोरीने त्याचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अवघ्या ३ तासात या खुनाची उकल केली असून या प्रकरणी अरूण निळकंठ खाडे (४२, रा. म्हैसाळ रोड, म्हाडा कॉलनी) याला अटक करण्यात आली आहे.