News Flash

किरकोळ कारणावरून सांगलीत तरुणाचा खून

प्लॉटच्या कारणावरून सांगलीतील कर्नाळ रोडवरील काकानगर येथे शुक्रवारी दुपारी एका तरुणाचा खून झाला असून या बाबत रितसर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

| May 24, 2014 03:47 am

प्लॉटच्या कारणावरून सांगलीतील कर्नाळ रोडवरील काकानगर येथे शुक्रवारी दुपारी एका तरुणाचा खून झाला असून या बाबत रितसर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
संतोष शिवाप्पा तेवरे या तरुणाच्या वडिलांनी भावासोबत संयुक्त १५०० चौरस फुटाचा भूखंड घेतला होता. या भूखंडावरून चुलत भावाशी काही दिवसांपूर्वी भांडणेही झाली होती. आज दुपारी संतोष तेवरे याला अज्ञात दोघांनी काठीने जबर मारहाण केली. त्यात तो जागीच ठार झाला. या संदर्भात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 3:47 am

Web Title: youngs murder over minor purpose
टॅग : Sangli
Next Stories
1 कराडच्या पाणीपुरवठय़ाबाबत जपानशी सामंजस्य करार
2 एलबीटी व जकातीतील तफावत दूर व्हावी- कुलकर्णी
3 पंढरपूरजवळ वाळू उपसाधारक आणि ग्रामस्थांमध्ये मारामारी
Just Now!
X