02 April 2020

News Flash

अल्पवयीन विद्यार्थिनीवर युवकांचा प्राणघातक हल्ला

मागील काही दिवसांपासून आरोपी पीडित तरुणीचा पाठलाग करीत होता.

चंद्रपूर : ‘माझ्यासोबत भ्रमणध्वनीवर का बोलत नाही’ या कारणावरून २३ वर्षीय युवकाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी कार्तिक मिश्रा याच्यावर विनयभंग व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

कार्तिक मिश्रा जलनगरातील रहिवासी आहे. चंद्रपुरातील अल्पवयीन मुलगी  महाविद्यालयात इयत्ता बारावीची परीक्षा देत आहे. मागील काही दिवसांपासून आरोपी पीडित तरुणीचा पाठलाग करीत होता. पहिल्या पेपरलाही त्या युवकाने पीडितेला त्रास दिला. माझ्याशी का बोलत नाही, या कारणावरून तिच्यासोबत हुज्जत घातली. २२ फेब्रुवारीला संध्याकाळच्या सुमारास ती कामानिमित्त बाहेर गेली असता, त्या युवकाने तिचा पाठलाग केला. तिच्यासमोर आपली दुचाकी थांबवून माझ्यासोबत बोलत जा, असे ठणकावून सांगितले. त्यावर पीडितेनेही त्यास ठणकावले असता, रागाच्या भरात युवकाने युवतीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचा डोळा, कान व तोंडाला गंभीर दुखापत होऊन ती रक्तबंबाळ झाली. त्याच दिवशी पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी प्रारंभी कानाडोळा केल्याचा आरोप पीडितेने केला. घटनेच्या दिवशी पीडितेला बोलता येत नव्हते. मंगळवारी पुन्हा तक्रार नोंदवली. सध्या आरोपी फरार असून, रामनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2020 2:26 am

Web Title: youth absconded after attack on minor girl student zws 70
Next Stories
1 रत्नागिरी विभागाची आज प्राथमिक फेरी
2 राज्य शासनाच्या ‘गो-गर्ल-गो’ या उपक्रमाचा फज्जा
3 नराधम बापाकडून मुलीवर बलात्कार
Just Now!
X