News Flash

अल्पवयीन मुलीचे अश्लील छायाचित्र फेसबुकवर टाकणारा जेरबंद

फेसबुकच्या मुख्यालयाशी संपर्क साधून पिडीत मुलीच्या बनावट फेसबुक खात्याची चौकशी करण्यात आली

अलिबाग  : अल्पवयीन मुलीचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून अश्लील छायाचित्र फेसबुकवर  प्रसिध्द करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. रायगड पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने कौशल्यपूर्ण तपास करून त्याला जेरबंद केले आहे.

राजेंद्र तेलंगे असे या तरुणाचे नाव असून त्याला २ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

कोलाड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. अल्पवयीन मुलीचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून तिचे गावातील एका तरुणासोबतचे अश्लील फोटो फेसबुक अकाऊंटवर प्रसिध्द करण्यात आले होते. यामुळे मुलीची बदनामी झाली. याप्रकरणी भादवी कलम ५०० आणि माहिती तंत्रज्ञान अधियम कलम ६६ सी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यचे स्वरुप लक्षात घेऊन या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी दिले होते.

यानंतर गुन्ह्यचा प्रकरणाचा रायगड पोलिसांच्या सायबर शाखेकडे वर्ग करण्यात आला. सायबर सेलचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश साखरकर यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.

फेसबुकच्या मुख्यालयाशी संपर्क साधून पिडीत मुलीच्या बनावट फेसबुक खात्याची चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेली माहिती संकलन करून त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. यानंतर छायाचित्र अपलोड करणाऱ्या मोबाईल नंबरचा शोध लावण्यात आला. हा मोबाईल नंबर कोणाच्या नावावर आहे. याचा शोध घेण्यात आला. तेव्हा हा मोबाईल कोलाड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर  पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संबधित राजेंद्र यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरवातीला त्याने तपासात सहकार्य करण्यास नकार दिला.

मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आपल्या गुन्ह्यची कबूली दिली. यानंतर त्याला अटक करून कोलाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश साखरकर, पोलीस हवालदार शशीकांत भोईर, पोलीस नाईक अमोल घरत, पोलीस शिपाई शितल घरत, अक्षय पाटील, तुषार घरत, सिध्देश िशदे यांनी महत्वाची भुमिका बजावली. कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 2:15 am

Web Title: youth arrested for uploading obscene photos of minor girl on facebook zws 70
Next Stories
1 वाहनाच्या धडकेने बिबटय़ाचा मृत्यू
2 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यवतमाळातून विधान परिषदेवर जाणार?
3 नाणार रिफायनरी प्रकल्प विदर्भात आणा
Just Now!
X