News Flash

लग्नाच्या बेडीऐवजी पोलिसांकडून चतुर्भुज

भावी पत्नीला आणण्यासाठी तो मुलींच्या वसतीगृहात बेकायदा घुसला

मुलींच्या वसतीगृहात घुसून कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली

‘प्यार किया तो डरना क्या’ असे कितीही कोणी म्हटले तरी प्रेमी जोडप्यांना याचा काय त्रास सहन करावा लागतो हे ज्याचे त्यालाच माहित. काहींचे प्रेमविवाह यशस्वी होतात तर काहींना लाचारी पत्करावी लागते. चांदवड येथील एका युवकाने एक चूक केली आणि लग्नाच्या बेडीत अडकण्याऐवजी त्याला पोलिसांच्या बेड्या पडल्या.  गुरूवारी त्याला उशिराने न्यायालयात हजर करण्यात आले.

चांदवड येथील भैरवनाथ येथे मुलींचे वसतीगृह आहे. या ठिकाणी विविध महाविद्यालयांत शिकणा-या मुली राहतात. या वसतीगृहात राहणारी व एस.एम.टी महाविद्यालयात शिक्षण घेणारी युवती आणि तिच्या बरोबर त्याच वर्गात शिक्षण घेणा-या एका विद्यार्थ्याशी प्रेम संबंध जुळले. त्यांचे एकमेकांवर प्रेम असल्याने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. घरच्यांचा लग्नाला विरोध असल्याने त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचे ठरवले.

यासाठी त्यांनी सूत्रबद्धपणे नियोजन आखले. बुधवारी त्यांचा या सत्रातील शेवटचा दिवस असल्याने मुलीने प्रियकरास वसतीगृहात बोलावले. दोघेही  पळ काढणार तितक्यात तेथील एका विद्यार्थीनीने या दोघांना पाहिले व अधिक्षिकेला याची माहिती दिली. यावरून गोंधळ उडाल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. मुलींच्या वसतीगृहात बेकायदा प्रवेश केल्यामुळे त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला न्यायालयात सादर करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 10:37 pm

Web Title: youth arrested in nashik break in ladies hostel
Next Stories
1 उद्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक, प्रशासनाची तयारी पूर्ण
2 सुरेंद्र शेजवळ हत्याप्रकरणातील तीन संशयित अटकेत
3 अफजलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमणे हटवा, उच्च न्यायालयाचा आदेश
Just Now!
X