News Flash

आईच्या चिते जवळच मुलाची पेटवून घेऊन आत्महत्या

आईच्या चितेजवळच मुलाने चारचाकीवर डिझेल टाकून गाडीसह स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या

आईच्या चितेजवळच मुलाने चारचाकीवर डिझेल टाकून गाडीसह स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना लातूर जिल्ह्यात घडली.

आईच्या चितेजवळच मुलाने चारचाकीवर डिझेल टाकून गाडीसह स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना लातूर जिल्ह्यात घडली. मृत युवकाचे नाव गजानन कोडलवाडे (वय ३८) असून त्याने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही. हा प्रकार रविवारी रात्री घडला.

अधिक माहिती अशी, गजानन कोडलवाडे हा खासगी वाहन चालक आहे. त्याची दोन लग्नं झाली होती. गेल्या काही कौटुंबिक कलह वाढला होता. त्यातच तीन दिवसांपूर्वी त्याच्या आईचा मृत्यू झाला होता. पण रविवारी रात्री अचानक गजानन हा अहमदपूर तालुक्यातील चोबळी रस्त्यावरील शिरूर ताजबंद शिवारात गेला. येथील स्मशानभूमीत त्याच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आईच्या चितेशेजारीच त्याने आपल्याबरोबर आणलेल्या स्कॉर्पियोवर डिझेल टाकले आणि स्वत:ला गाडीत कोंडून पेटवून घेतले. यात १०० टक्के होरपळून त्याचा जागीच मृत्यू झाला.

गजानने आत्महत्या का केली याची अद्याप माहिती समजलेली नाही. अहमदपूर पोलीस तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 4:57 pm

Web Title: youth commit suicide near mothers balefire in latur district
Next Stories
1 शिवसेना म्हणजे ‘आम्ही नाही त्यातले अन्..’, जयंत पाटील यांची टीका
2 देश हुकुमशाहीकडे, आगामी निवडणुका महत्वाच्या: अजित पवार
3 ‘शिवसेना भाजपा हे पती पत्नी नाहीत ते तर प्रियकर प्रेयसी’
Just Now!
X