News Flash

“भाजपाच्या आयटी सेलशी दोन हात करण्यासाठी युवक काँग्रेसची सोशल मीडिया चॅम्पियन टीम तयार करणार”

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांची घोषणा

संग्रहीत

भाजपाच्या आयटी सेलशी दोन हात करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सज्ज झाली असून, आता युवक काँग्रेसची सोशल मीडिया चॅम्पियन टीम तयार करण्याचा निर्णय युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी घेतला आहे.

भाजपातर्फे सोशल मीडियावर सुरु असलेला अपप्रचार, खोट्या बातम्या तसेच जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ‘सोशल मीडिया चॅम्पियन’ या सोशल मीडिया कार्यकर्त्यांच्या नोंदणी मोहिमेची घोषणा आज केली आहे, असे युवक काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले आहे.

तसेच, “भाजपाचा अपप्रचार, धार्मिक ध्रुवीकरण आणि प्रोपोगंडा निर्माण करण्याच्या प्रयत्नांना हाणून पाडण्याचे काम ‘सोशल मीडिया चॅम्पियन्स, करतील आणि केंद्र सरकारच्या जनताविरोधी धोरणांविरोधात आवाज उचलतील. याशिवाय लोकशाही तत्वांना आणि संविधानिक मूल्यांनाबळकटी देण्याचे काम देखील केले जाईल.” असा विश्वास यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला.

आगामी काळात पक्षाची भूमिका , ध्येयधोरणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे सोशल मीडिया चॅम्पियन्स प्रभावीपणे करतील असेही यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि सोशल मीडिया प्रमुख समन्वयक ब्रीज दत्त त्यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2021 6:29 pm

Web Title: youth congress to form social media champion team satyajit tambe msr 87
Next Stories
1 “फक्त लॉकडाऊन करून भागणार नाही”, सुधीर मुनगंटीवारांचा सरकारवर निशाणा!
2 …तर मी पैसे खाणाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं असतं; उदयनराजेंचा ‘लॉकडाउन’विरोधात एल्गार
3 “संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय होणार”; उपमुख्यमंत्र्यांचं सूचक विधान!
Just Now!
X