राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील एका तरूणाने मतदान केंद्र शोधण्यासाठी विकसित केलेले मोबाईल अॅप्लिकेशन नवमतदारांसाठी फलदायी ठरू शकते. एरवी मतदारसंघाची पुर्नरचना आणि अन्य तांत्रिक बाबींमुळे निवडणुकीच्या दिवशी स्वत:चे मतदान केंद्र शोधताना धावपळ करावी लागल्याचा अनुभव अनेकांना आला असेल. त्यात पहिल्यांदा मतदान करत असणाऱ्यांसाठी तर सगळेच वातावरण नवीन असल्याने बहुतेकदा त्यांचा गोंधळ उडताना दिसतो. मात्र, श्रीकांत निंबाळकर या नाशिकमधील तरूणाने विकसित केलेले मोबाईल अॅप्लिकेशन या गोंधळावर उत्तम उपाय ठरण्याची शक्यता आहे. माहिती संशोधक असलेल्या श्रीकांतने नुकतेच अमेरिकेतील जोन्स हॉपकिन्स विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
अँड्रॉईड मोबाईलधारक गुगल प्लेस्टोरवर जाऊन ‘मतदार यादी अॅप’ डाऊनलोड करू शकतात. अगदी शेवटच्या क्षणी निवडणूक यादीत नाव नोंदवलेल्या मतदारांना या अॅप्लिकेशनच्या सहाय्याने स्वत:च्या मतदान केंद्राचा क्रमांक आणि पत्ता सहजपणे उपलब्ध होऊ शकतो. ‘मतदार यादी अॅप’ उघडल्यानंतर त्यामध्ये मतदाराचा जिल्हा, मतदारसंघ आणि अन्य माहिती भरल्यानंतर एका क्लिकसरशी मतदान केंद्राचा क्रमांक आणि पत्ता मिळु शकतो.

System for one vote of disabled person in remote village
लोकशाहीची खरी ताकद! दिव्यांग व्यक्तीच्या एका मतासाठी यंत्रणा दुर्गम गावात
Dindori, Sharad Pawar
दिंडोरीतून मार्क्सवाद्यांच्या माघारीने शरद पवार गटाला बळ
Environment
निवडणुकीच्या जाहीरनाम्यात पर्यावरणाचा समावेश करावा, पर्यावरणप्रेमींचे निवडणूक आयोगाला पत्र
ठाण्यासाठी शिंदे गटाच्या जोर-बैठका; मतदारसंघात उमेदवारीसाठी कार्यकर्ते आग्रही ; भाजपाला जागा जाण्याच्या चर्चेने अस्वस्थता