News Flash

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाचा इचलकरंजी जवळ खून

जुन्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो आहे

प्रतिकात्मक छायाचित्र

इचलकरंजी शहराजवळ एका बंद पडलेल्या कापड प्रक्रिया गृहात एका तरुणाची हत्या झाल्याचे मंगळवारी उघडकीस आले. अनिल मासाळ असे त्याचे नाव असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे सूत्रांनी सांगितले. डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या पार्वती इंडस्ट्रीज मध्ये बंद पडलेल्या प्रोसेसमध्ये एका इसमाच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना नागरिकांना कळताच नागरिकांनी शहापूर पोलीस ठाण्यात याची माहिती दिली याची माहिती संपूर्ण परिसरामध्ये कळताच नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली होती ज्याची हत्या झाली आहे त्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याचे नाव निष्पन्न झाले  अनिल शिवाजी मासाळ (राहणार तारदाळ संगमनगर) या ठिकाणी राहण्यास होता .

अनिल हा सन २०१६ मध्ये भगतसिंग बागेजवळ मित्राची हत्या करण्यात अनिल याचा सहभाग होता. उमेश बागलकट्टी याच्या डोक्यामध्ये दगड घालून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अनिल मासाळ सह अन्य चार जणांवर खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.
गेल्या दोन दिवसापासून अनिल हा कामावर न जाता अन्यत्र फिरत होता. पण काल सकाळपासूनच अनिल घरातून गायब होता. त्यामुळे त्याचा भाऊ व त्याचे घरातील त्याचा शोध घेत होते.

आज दुपारच्या सुमारास पार्वती इंडस्ट्रीज मध्ये विनायक शेर्लेकर यांच्या बंद पडलेल्या प्रोसेस सेंटरमध्ये काल रात्री अनिल याला नेऊन मद्य प्राशन, गांजा सेवन केले. नशा आल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून करण्यात आला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. घटनास्थळी त्याची दुचाकी लावण्यात आली आहे. निर्जनस्थळी अनिल याची हत्या केली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन गाडीचा पंचनामा केला.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत एका आरोपीला ताब्यात घेतले आहे . हत्या जुन्या वादातून झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे , पोलीस उप अधीक्षक गणेश बिराजदार, शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. एन. पाटील आदी अधिकाऱ्यांनी भेट दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 10:18 pm

Web Title: youth murder in ichalkaranji police case registered scj 81
Next Stories
1 ज्यांना तिकिट मिळालं नाही त्यांची माफी मागतो : उद्धव ठाकरे
2 “अजित पवारांच्या डोळ्यातले पाणी म्हणजे मगरीचे अश्रू”
3 राम मंदिराचा मुद्दा शिवसेना सोडणार नाही: उद्धव ठाकरे
Just Now!
X