News Flash

कोल्हापूरचा मावळा युथ ऑलिम्पिकमध्ये चमकला, शाहु मानेला नेमबाजीत रौप्यपदक

अंतिम सामन्यात अवघ्या 1.7 गुणांनी शाहुचं सुवर्ण पदक हुकलं.

कोल्हापूरकर १६ वर्षीय शाहू माने याने भारताला युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले आहे. त्याच्या या पदकामुळे अर्जेंटीनाच्या ब्यूनस आयर्स येथे रविवारपासून सुरू झालेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आपलं पदकांचं खातं खोललं आहे. नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात शाहुने रौप्य पदकाची कमाई केली.


अंतिम सामन्यात अवघ्या 1.7 गुणांनी शाहुचं सुवर्ण पदक हुकलं. अंतिम सामन्यात त्याने एकूण 247.5 गुण मिळवले. तर रशियाच्या ग्रिगोरी शामाकोव याने 249.2 गुण मिळवून सुवर्ष पदक पटकावलं, आणि सर्बियाच्या अलेस्का मिट्रोविक याने 227.9 गुण मिळवून कांस्य पदक मिळवलं. शाहु माने हा एकमेव भारतीय नेमबाज या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरला होता. पात्रता सामन्यांमध्ये त्याने शानदार प्रदर्शन करताना एकूण 623.7 गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2018 11:54 pm

Web Title: youth olympics shooting tushar shahu mane wins first silver medal in 10m air rifle
Next Stories
1 Pro Kabaddi, Season-6 : मुंबई पुण्यात कांटे की टक्कर, सामन्यात 32-32 अशी बरोबरी
2 Pro Kabaddi, Season-6 : गतविजेता पटणा पहिल्याच सामन्यात पराभूत; तामिळकडून ४२-२६ ने पराभव
3 U-19 Asia Cup : भारताने सहाव्यांदा पटकावला चषक; अंतिम फेरीत श्रीलंकेवर मात
Just Now!
X