25 September 2020

News Flash

नागपूर विमानतळावरुन इसिसच्या तीन संशयितांना अटक

अब्दुल वसीम, उमर हसन फारुखी, माज हसन फारुख अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहे.

मुंबईच्या मालवणीतील काही तरूण इसिसमध्ये सामील होण्यासाठी गेल्याची बातमी ताजी असतानाच एटीएस अधिका-यांनी इसिसमध्ये सामील होण्यास जाणा-या तीन तरूणांना नागपूर विमानतळावर अटक केली आहे. अब्दुल वसीम, उमर हसन फारुखी, माज हसन फारुख अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहे. हे तिघेही तेलंगणचे रहिवासी आहेत.
हैदारबादमधील हे तीन तरुण इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी अफगणिस्तानकडे जात होते. याची माहिती मिळाल्यानंतर त्या तिघांना नागपूर विमानतळावरून अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना  हैदराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.  गुप्तचर यंत्रणांना याबाबतची माहिती एटीएसला दिल्यानंतर आज सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना सापळा रचून पकडण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 11:47 am

Web Title: youth suspected of joing isis arrested in nagpur airport
Next Stories
1 चंद्रपूर, सिंधुदुर्गचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न
2 द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी
3 इको सेन्सिटिव्हमुळे अवैध उत्खननात वाढ
Just Now!
X