News Flash

फक्त चार सफरचंदाच्या वादातून तरुणाचा जीव गेला

चार सफरचंद चोरल्याच्या आरोपाखाली झालेल्या मारहाणीत ३० वर्षीय स्वप्नील डोंगरेचा मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

माणूसाचा मृत्यू होण्याची अनेक कारणे आपल्याला माहित आहे. परंतू सफरचंदामुळे कुणाचा मृत्यू होणे ह्यासारखी कोणती दुर्दैवी घटना नाही. अशीच एक दुर्दैवी घटना नागपुरात घडली आहे. चार सफरचंद चोरल्याच्या आरोपाखाली झालेल्या मारहाणीत ३० वर्षीय स्वप्नील डोंगरेचा मृत्यू झाला आहे.

एका लग्न समारंभात स्वप्नील केटरिंगसाठी फळांच्या स्टॉलवर काम करत होता. लग्न संपल्यानंतर ४ सफरचंद बाजूला काढून ठेवले. या नाहक कारणामुळे लग्नातील वऱ्हाड्यांनी त्याला मारहाण केली. या मारहाण तो गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयातील अनेक दिवसांची मृत्यूची झुंज दिल्यानंतर त्याचा अखेर मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांनी आता १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात हत्या, दंगल,आणि अॅट्रॉसिटीचा यांसारख्या गुन्ह्यांची नोंद आहे.

स्वप्नील गेल्या अनेक वर्षांपासून लग्न समारंभात केटरिंगमध्ये फ्रूट सलाडच्या स्टॉलवर काम करायचा. ३ मे रोजी तो क्वेटा कॉलनी पाटीदार भवन येथे वाघेला कुटुंबीयांच लग्न होत. लग्न समारंभात फ्रूट सलाडचा स्टॉल सांभाळत होता. साधारण साडे अकरा वाजता लग्न  संपल्यानंतर, स्वप्नीलने राहिलेल्या फळांमधून ४ सफरचंद बाजूला काढून ठेवले. लग्नातील वऱ्हाड्यांपैकी काहींनी ते पाहिले. याच चोरीच्या संशयावरुन वऱ्हाड्यांनी  रागात स्वप्नीलला बेदम मारहाण केली.  इतर केटरिंग सहकाऱ्यांनी स्वप्नीलला वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र वऱ्हाड्यांनी त्यांनाही मारहाण केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. एबीपी माझा या घटनेचे वृत्त दिले आहे.

या मारहाणीत स्वप्नीलला पोटात अंतर्गत जखमा झाल्या. जखमी झालेल्या स्वप्नीलचा वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार झाला. मात्र जबर मारहाणीत त्याचे आतडे आणि यकृत अर्थात लिव्हरला जबर दुखापत झाल्यामुळे, 10 मेच्या रात्री मृत्यूसोबतची त्याची झुंज अपयशी ठरली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 8:18 pm

Web Title: youths death due to suspecting apple theft
Next Stories
1 जावयाने केली सासूसह तिघांची हत्या
2 कुरिअरमधून कोकेनची तस्करी करणाऱ्यास अटक
3 मुलगी तिरळी पाहते म्हणून पाच लाख मागितले
Just Now!
X