News Flash

वर्धा : करोनामुळे वर्ध्यात सार्वजनिक स्वच्छतेचा मंत्र अधिक प्रभावी, नागरिकांमध्ये वाढतेय सजगता

शहरातील सार्वजनिक जागांवर वृक्षारोपणाची मोहीम सक्रीय

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अधिक काळ देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासन नागरिकांना वारंवार सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन करत होतं. यावेळी स्वच्छतेविषयीही जनजागृती केली जात होती. वर्धा शहरातील नागरिकांनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर सार्वजनिक स्वच्छतेचा विषय अधिक गांभीर्याने घेतल्याचं पहायला मिळतंय.

करोनाने स्वच्छतेचा मंत्र अधिकच प्रभावी केल्यानंतर जनतेत याविषयी सहकार्य करण्याची भावना बळावली आहे. शहरात व गावात ठिकठिकाणी दुर्लक्षीत जागेवर कचरा पडून असतो, अशा जागा हेरून जनतेच्या सहकार्याने सार्वजनिक पसरबाग फुलविण्याच्या युवकांच्या उपक्रमास भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत दक्षता घेतल्या जातात. मात्र शहरातल्या विविध भागात रस्त्यालगत निरूपयोगी मोकळा परिसर असतो. याच जागेत लोकं कचरा, शिल्लक अन्न, फळभाज्या टाकून देतात. गुरं-ढोरं त्याच घाणीत लोळतात.

बहुतांश अशा जागा शासकीय असल्याने जागेच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आल्यावर युथ फॉर चेंज या संघटनेने अशा जागा टिपल्या. त्या स्वच्छ करून त्या ठिकाणी ‘स्मॉल ग्रीन गार्डन’ तयार करणे सुरू केले आहे. ५ जून या पर्यावरण दिनापासून सुरू झालेल्या या उपक्रमात पंधरा जागा स्वच्छ करून झाडे लावण्यात आली. जागा मोठी असल्यास गुलमोहर, बकुळ, कदंब, अशी झाडे लावल्या जात आहे. छोट्या जागेत फायकस, बोनसाय फुलविण्याचा प्रयत्न होत असल्याचे संस्थेचे गुरूराज राउत यांनी सांगितले. त्या भोवती आरोग्यवर्धक म्हणून तुळशीची झाडे लावण्यात येतात. जमीनीवर हिरवळ लावून फुलपाखरांना आकर्षीत करण्याचा विचार आहे. त्यामूळे चिमण्यापण या जागेवर येतील. जीवनसाखळी सशक्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचे राउत म्हणाले. संघटनेने हे काम सुरू केले मात्र बागेची पूढेही निगा राखण्यासाठी परिसरातील लगतच्या सात घरांवर जबाबदारी टाकल्या जाणार आहे. प्रत्येक कुटूंबाने एक दिवस वाटून घेत बागेची निगा राखण्याची जबाबदारी सांभाळण्याची अपेक्षा आहे. डॉ. राजेश आसमवार, डॉ. सचिन पावडे, श्याम भेंडे, डॉ. अंकिता गोडे यांनी या कार्यात सहकार्य केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 7:26 pm

Web Title: yuth for change organisation in wardha spreading awareness about clean atmosphere psd 91
Next Stories
1 यवतमाळ : करोनाबाधितांचे द्विशतक पार
2 यवतमाळ : अनावश्यकपणे बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
3 यंदा पंढरीच्या वाटेवर असणार तिहेरी पोलीस बंदोबस्त
Just Now!
X