ठाकरे कुटुंबातील पुढची पिढी म्हणजेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे एकत्र आले आहेत. मात्र राजकारण नव्हे तर फुटबॉलप्रेमामुळे आदित्य आणि अमित ठाकरे एकत्र आले असून शनिवारी रात्री लोअर परळमधील ख्यातनाम हॉटेलमध्ये या दोघांची भेट झाली. या भेटीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध सर्वश्रुत आहेत. ठाकरे बंधूंनी एकत्र यावे यासाठी मोहीमही राबवण्यात आली. मात्र ठाकरे बंधूंमधील दुरावा कमी झाला नाही आणि सेना- मनसे युतीचे स्वप्नही भंगले. मात्र ठाकरे कुटुंबातील पुढची पिढी म्हणजेच उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे दोघे शनिवारी रात्री लोअर परळमधील प्रसिद्ध हॉटेलमध्ये एकत्र भोजन करताना दिसले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या भेटीवरुन काहींनी तर्कवितर्कही लढवायला सुरुवात केली. मात्र काही वेळेतच या भेटीचे कारण समोर आले.

Candidates Chess Tournament Alireza Firuza defeats D Gukesh sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: फिरुझाकडून गुकेश पराभूत
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
chess
भारतीय बुद्धिबळपटू सज्ज; प्रतिष्ठेच्या ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेला आजपासून प्रारंभ
candidates tournament 2024 marathi news, candidates tournament 2024 chess marathi news
विदित, प्रज्ञानंद, गुकेश… यांच्यातील कोणी विश्वनाथन आनंद बनेल?

फुटबॉलप्रेमामुळे आदित्य आणि अमित ठाकरे एकत्र आल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रीमिअर फुटसाल लीग या फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनात अमित ठाकरे यांनी मोलाची भूमिका निभावली. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूही सहभागी झाले आहेत. या खेळाडूंना भेटण्याची इच्छा आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली होती. यानिमित्त आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची भेट झाली. दोघांनी एकत्र जेवण केले. या भेटीचे फोटो प्रसारमाध्यमांमध्ये झळकले असून या भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची घाई करु नये असे राजकीय विश्लेषकांचे सांगितले. यापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेदेखील एकत्र आले होते. पण त्यानंतरही दोन्ही पक्षांची युती झाली नव्हती याकडे अनेकांनी लक्ष वेधले.