नाराज भाजपचे सेनेऐवजी ‘नोटा’ला प्राधान्य

सांगली : काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांनी १ लाख ६२ हजारांचे मताधिक्य देणाऱ्या पलूस-कडेगाव मतदार संघाने तब्बल २० हजार ५७२ मते ‘नोटा’ला देऊन लक्ष वेधून घेतले आहे. कदम यांचा विजय एकतर्फी दिसत असला, तरी पारंपरिक प्रतिस्पर्धी देशमुख गटाने ‘नोटा’ला मतदान करून आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
dhairyasheel mane criticizes raju shetty
“पाठिंब्यासाठी दुसऱ्याच्या पायऱ्या का झिजवत आहेत?”, खासदार माने यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका
Abigail Lupi
फेनम स्टोरी: केअर गर्ल अबिगेल
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये विश्वजित कदम यांना भाजपने संधी  दिली, तरी यानंतरची निवडणूक लढायचीच असा निग्रह केला होता. यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी तयारीही केली होती. गेली दोन वर्षे ते आमदारकीच्या निवडणुकीसाठी तयारी करीत होते.

मात्र महायुतीच्या जागा वाटपात तुल्यबळ लढत होण्याची शक्यता दिसत असताना ही जागा भाजपने सेनेला दिली. शिवसेनेनेही जिल्हा प्रमुख संजय विभुते यांना ऐन वेळी उमेदवारी देत मदानात उतरविले. भाजपाबरोबरच सेनेनेही कदम यांच्यासाठी नुरा कुस्तीचाच डाव रचला असल्याचे स्पष्ट झाले होते. कारण शेजारच्या मतदार संघात प्रचारासाठी आलेल्या पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पलूस-कडेगावासाठी वाट वाकडी करावी असे वाटले नाही. प्रचारात शिवसेनेचे नेतेही या मतदार संघात फिरकले नाहीत.

भाजपची तयारी करून ऐन वेळी सेनेच्या उमेदवारीचा आग्रह संग्रामसिंह देशमुखांनी नाकारला असला, तरी यामागे अंडरस्टँडिंग असावे अशी चर्चा गेली १५ दिवस जिल्ह्य़ात सुरू आहे. याचबरोबर पारंपरिक गट शाबूत रहावा यासाठी महायुतीचा धर्म बासनात बांधत देशमुख गटाने नोटाला मतदान करीत आपले अस्तित्व कायम राखण्याचा प्रयत्नही केल्याचे यावरून दिसून आले. समाज माध्यमातून तसे आवाहनही करण्यात आले होते.

असाच प्रकार लातूर ग्रामीण मतदार संघामध्ये भाजपची ताकद दुर्लक्ष करीत शिवसेनेला जागा दिल्याने निर्माण झालेल्या नाराजीतून मोठय़ा प्रमाणात नोटाला मतदान झाले आहे. यामागेही अंडरस्टँिडगच असल्याचे मानले जात आहे.