रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी ७८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. अर्जमागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ३४ जणांनी माघार घेतल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

निवडणुकीसाठी १३१ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली होती. यात ११३ पुरुष आणि १८ महिलां उमेदवारांचा समावेश होता. छाननी दरम्यान १५ पुरुष आणि ४ महिला असे १९ जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले. तर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ३४ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यात २९ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश होता. त्यामुळे आता ७ जागांसाठी ७८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात ६९ पुरुष आणि ९ महिला उमेदवारांचा समावेश आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघासाठी १०, कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी ११, उरण मतदारसंघासाठी ८, पेण मतदारसंघासाठी १४, अलिबाग विधानसभा मतदारसंघासाठी १३, श्रीवर्धन मतदार संघासाठी १४, तर महाड विधानसभा मतदारसंघासाठी ८ उमेदवार निवडणूक रिंगणात  आहेत. उमेदवारांना चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता निवडणूक प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे.