11 November 2019

News Flash

पुणे महापालिकेचा अनोखा उपक्रम; मतदान केंद्रांवर प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती

मतदानासाठी होणाऱ्या गर्दीचा चांगल्या प्रकारे उपयोग करीत पुणे महानगरपालिकेने एकदाच वापराच्या प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती मोहिम राबवली आहे.

पुणे : महानगरपालिकेकडून मतदान केंद्रांवर सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर न करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. (फोटो- अरुल होरिझॉन, पुणे)

विधानसभेसाठी राज्यात आज सर्वत्र उत्साहात मतदान सुरु आहे. पुणे शहरातही पावसाने विश्रांती घेतल्याने मतदानासाठी केंद्रांवर गर्दी पहायला मिळत आहे. दरम्यान, या गर्दीचा चांगल्या प्रकारे उपयोग करीत पुणे महानगरपालिकेने एकदाच वापराच्या प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती मोहिम राबवली आहे.

पर्यावरणाला हानिकारक असणारे आणि पुन्हा उपयोगात आणण्यासाठी प्रक्रिया होत नसलेल्या सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर न करण्याबाबत पुणे महानगरपालिकेकडून शहरातील सर्व मतदान केंद्रांवर जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी एक सेल्फी स्पॉट तयार करण्यात आला असून इथे एका हिरव्या रंगाच्या फलकावर “आजपासून मी सिंगल यूज प्लॅस्टिक वापरणार नाही” असे निर्धार करणारे वाक्य लिहिले असून त्यासोबत सेल्फी घेण्याचे आवाहन केले जात आहे. याद्वारे ‘मी मतदान केलं, तुम्हीही केलंत का?’ असा प्रश्नही अद्याप मतदान न केलेल्या मतदारांना विचारण्यात आला आहे.

यासंदर्भात पुणे महापालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी म्हटले की, “मी सर्वांना जाहीर विनंती करतो त्यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ या उपक्रमांतर्गत २१ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी निवडणूक केंद्रावर मतदानासाठी जाऊन त्याठिकाणी मतदानानंतर “आज पासून मी सिंगल युज प्लास्टिक वापरणार नाही” या सेल्फी स्पॉटवर सेल्फी काढून तो आपल्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअॅपवर पोस्ट करावा.”

First Published on October 21, 2019 2:11 pm

Web Title: a unique initiative of pune municipal corporation awareness about plastic ban at polling stations aau 85