02 March 2021

News Flash

आरे कारशेडला स्थगिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असल्याची माहिती आज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. पुढचा विचार केला जाईल तोपर्यंत आरे कारशेडमधलं एक पानही तोडता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मोठी घोषणा केली आहे. रातोरात झाडांची कत्तल मंजूर नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. एका रात्रीतून झाडच काय झाडाचं पानही तोडता येणार नाही असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

विधीमंडळ पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. ठाकरे कुटुंबाने स्वतःसाठी काहीही केलं नाही हे सगळ्या पत्रकारांना माहित आहे. मी काहीही न सांगता मुख्यमंत्री झालो आहे. महागाई, भ्रष्टाचार, टंचाई या सगळ्याचा सामना आम्हाला करायचा आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी न सांगता मुख्यमंत्री झालो आहे. मी मुख्यमंत्री म्हणून येईन असं काही सांगितलं नव्हतं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

महागाई, टंचाई, भ्रष्टाचार यांचा सामना महाविकास आघाडीला करायचा आहे. मंत्रालयातल्या परंपरा, प्रथा मला ठाऊक नाहीत तरीही हे शिवधनुष्य उचललं आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. कराच्या रुपाने येणारा पैसा आपण कसा खर्च करतो? याचं उत्तर जनतेला द्यायचं आहे असंही प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मोठी आव्हानं पाहून मी पळून गेलेलो नाही. हे आव्हान स्वीकारलं आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2019 5:15 pm

Web Title: aarey carshed work has stopped for now says cm uddhav thackeray scj 81
Next Stories
1 ओवेसींनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगितली धर्मनिरपेक्षतेची व्याख्या, म्हणाले…
2 VIDEO: “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आता एकत्र आलं पाहिजे”
3 उद्धव ठाकरे सरकारची परीक्षा, उद्या पार पडणार बहुमत चाचणी
Just Now!
X