महायुती झाली तर महायुतीला 205 जागा मिळतील. समजा युती झाली नाही आणि भाजपा शिवसेना स्वतंत्र लढले तर भाजपाला 144 जागा मिळतील आणि शिवसेनेला 39 जागा मिळतील असा अंदाज एबीपी माझा आणि सी व्होटर्सने वर्तवला आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर एबीपी माझा आणि सी व्होटरने सर्व्हे घेतला. त्यामध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आला.

भाजपा 144 जागांसह स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत आहे असं एबीपी माझा आणि सी व्होटर्सचा सर्व्हे सांगतो. तर शिवसेनेसाठी सर्व्हेक्षण चिंता वाढवणारं आहे. कारण मागच्या वेळी मोदी लाटेतही शिवसेनेला 63 जागा मिळवल्या होत्या. मात्र यावेळेस एबीपी सी व्होटर्सच्या सर्व्हेच्या अंदाजानुसार 39 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र महायुती झाली तर 205 जागा महायुतीला मिळतील, असा अंदाज एबीपी सी व्होटर्सने वर्तवला आहे.

एबीपी माझा आणि सी व्होटर्सचा सर्व्हे काय सांगतो?

यंदा विधानसभेत कोणत्या पक्षाला किती जागा?

स्वतंत्र लढल्यास
भाजपा : 144
शिवसेना : 39
काँग्रेस : 21
राष्ट्रवादी काँग्रेस: 20
मनसे : 00
इतर : 64

महायुती झाल्यास
महायुती : 205
महाआघाडी : 55
इतर : 28

मुख्यमंत्री म्हणून कुणाला किती पसंती?

देवेंद्र फडणवीस : 38.6 टक्के

नितीन गडकरी : 7.1 टक्के

अजित पवार : 6 टक्के

उद्धव ठाकरे : 5 टक्के

राज ठाकरे 4.7 टक्के

शरद पवार : 4.7 टक्के

पृथ्वीराज चव्हाण : 3.2 टक्के

एकंदरीत हा सर्व्हे पाहिला तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता कायम राहिली आहे हे समोर येते आहे. आता पुढे नेमकं काय होणार ते निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. तूर्तास तरी महायुतीला 205 जागा मिळतील असं हा सर्व्हे सांगतो आहे.