28 May 2020

News Flash

महायुतीला १९२ ते २१६ जागा, एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलचा अंदाज

एबीपी माझा सी व्होटर्सचा एक्झिट पोल समोर

महायुतीला १९२ ते २१६ जागा मिळतील असा अंदाज एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. आजच सगळ्या उमेवादारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. या एक्झिट पोलनुसार महायुतीला १९२ ते २१६ जागा मिळतील, आघाडीला ५५ ते ८१ जागा मिळतील इतर पक्षांना ४ ते २१ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दुपारी ३ वाजण्याचा सुमारास जे मतदान झालं त्या मतदानाच्या टक्केवारीनुसार हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुती २०० पार जाणार यात काहीही शंका नाही असं एबीपी सी व्होटर्स च्या एक्झिट पोलने वर्तवला आहे. या निवडणुकीसाठी सगळ्याच नेत्यांनी प्रचारासाठीचं रणमैदान गाजवलं. मात्र भाजपा आणि शिवसेना यांचीच सरशी होणार हे एक्झिट पोलचे अंदाज सांगत आहेत. राज्यात सहा वाजेपर्यंत ६०.५ टक्के मतदान झाले आहे. मतदान अद्यापही सुरु असल्याने हा टक्का वाढण्याची शक्यताही असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

एबीपी सी व्होटर्स

विभागवार कुणाला किती जागा?

पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील ७० जागांपैकी ४२ जागा महायुतीला जिंकेल. २५ जागा महाआघाडीला तर इतरांना ३ जागांना

विदर्भ
विदर्भातील एकूण ६० जागांपैकी ५० जागांवर महायुती जिंकणार, ९ जागा महाआघाडीला तर इतरांना ३ जागा इतरांना मिळू शकतात

उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील ३६ पैकी २३ जागांवर महायुतीचा विजय, १२ जागा महाआघाडीकडे

मराठवाडा
मराठवाड्यातील ४७ जागांपैकी २६ जागा महायुतीला, १४ जागा महाआघाडीला इतरांना ६ जागा

विधानसभा निवडणुकीसाठी आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान पार पडले. मतदानाला आज सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली होती. २८८ जागांसाठी मतदान झालं. १४५ ही मॅजिक फिगर आहे. मतदान पार पडलं आहे. उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती निकालाच्या दिवसाची अर्थात गुरुवारची. गुरुवारी निकाल लागू लागतील तसं पुन्हा महाराष्ट्रात काय घडणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. शहरी भागात मतदान करण्याबाबत काहीसा निरुत्साह जाणवला तर ग्रामीण भागातील मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. आता निकालाच्या दिवशी काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2019 6:42 pm

Web Title: abp sea voters survey about assembly election scj 81
Next Stories
1 राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी; दोन जण गंभीर
2 Video : बोगस मतदानावरून बीडमध्ये क्षीरसागर आक्रमक
3 रुग्णालयातून बाहेर पडून १०२ वर्षांच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क
Just Now!
X