17 February 2020

News Flash

निवडणुकीनंतर शेकापला माईक्रोस्कोपने शोधावे लागेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रत्येकाला ताज महाल बांधून देऊ आणि चंद्रावर प्लॉट देऊ येवढी आश्वासनेच देण्याचे विरोधकांनी देण्याचे शिल्लक राहिले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

विकासाच्या नावाने केवळ राजकारण करणऱ्या शेकापला निवडणुकीनंतर माईक्रोस्कोपने शोधावे लागेल असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेकापवर निशाणा साधला. शेकापने मोर्चा काढला म्हणून खारेपाटातील पाणी प्रश्न नाही सुटला. तर मुख्यमंत्री जनताभिमुख होते म्हणून चाकोरीच्या बाहेर जाऊन एमएमआरडीएच्या माध्यमातून ३८ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. काही कारणामुळे मुंबई- गोवा महामार्गाचे काम रखडले होते. मात्र पुढील दोन वर्षांत हे काम पुर्ण होईल आणि यामुळे कोकणाच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

काँग्रेस राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यावरही मुख्यमंत्र्यांनी टिकास्त्र सोडले. प्रत्येकाला ताज महाल बांधून देऊ आणि चंद्रावर प्लॉट देऊ येवढी आश्वासनेच देण्याचे विरोधकांनी देण्याचे शिल्लक राहिले आहे. विरोधकांच्या पराभूत मानसिकतेचे हे लक्षण आहे. रायगड जिल्ह्यत यापुढे पर्यावरण पुरक आणि रोजगारक्षम उद्योग येतील.े अशी यावेळी ग्वाही त्यांनी दिली.

राज्याच्या पाच वर्षांतील कामाचा दाखला दिला. राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने पाच वर्षांत ५० हजार कोटींची थेट मदत उपलब्ध करून दिली. भाताला १७५० रुपये प्रती क्विंटल हमीभाव दिला. त्यावर ५०० रुपयांचा बोनसही दिला. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. पाच वर्षांत ३० हजार किलोमिटरचे ग्रामिण रस्ते, २० हजार किलोमिटरचे राष्ट्रीय महामार्ग मार्गी लागले. १८ हजार गावात पाणी पुरवठा योजना झाल्या. महिला बचत गटाच्या माध्यमातून ४० लाख परिवार जोडले गेले. मराठा समाजाला आरक्षण दिले. धनगर समाजाचे प्रश्न सोडविले. मच्छीमार बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु झाले. समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी तुमचे आशिर्वाद हवे आहे. भाजप सेना युतीच्या उमेदवारांना रायगडमधून निवडून द्या. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या प्रचार सभेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील, सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर, माजी आमदार अनिल तटकरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी, सल्लागार किशोर जैन, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, महिला आघाडीच्या दिपश्री पोटफोडे, अवधूत तटकरे, रिपाइंचे जगदीश गायकवाड, म्हाडाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, वैकुंठ पाटील, लक्ष्मणशेठ नावडेकर, भाजपचे जिल्हा चिटणीस यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

First Published on October 12, 2019 1:06 am

Web Title: after election shetkari kamgar paksh microscope will have to search abn 97
Next Stories
1 उल्हासनगरात सिंधूनगर मेट्रो स्थानक – मुख्यमंत्री
2 विदर्भात रिपब्लिकन पक्षांमधील दुहीचा लाभ कुणाला?
3 आमची निवडणूक : टिपरी-पाणीचा खेळ झाला आहे..
Just Now!
X