19 September 2020

News Flash

अजित पवार यांची पुन्हा विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड होणार ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची पुन्हा एकदा विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे.

संग्रहीत छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची पुन्हा एकदा विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. अजित पवार यांनी बंडखोरी करुन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी विधिमंडळ पक्ष नेतेपदावरुन हटवण्यात आले होते. त्यांच्या जागी जयंत पाटील यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदावर निवड करण्यात आली.

अजित पवार यांनी काल उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यापूर्वी ट्रायडंट हॉटेलमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर एक बैठक झाली. त्या बैठकीत बंडखोरी मागे घेतल्यास पक्षात योग्य तो सन्मान राखू असा शब्द अजित पवारांना देण्यात आला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा अजित पवारांची पक्षाच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे.

अजित पवारांनी शनिवारी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी विधिमंडळ नेते म्हणून त्यांच्याकडे असलेले राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सहीचे पत्र त्यांनी पाठिंबा म्हणून राज्यपालांना सादर केले होते. काल रात्री अजित पवारांनी सिलव्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास चार तास चर्चा झाली. आज सकाळी अजित पवार आमदारकीची शपथ घेण्यासाठी विधानभवनात आले. त्यावेळी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या बहिण-भावाच्या नात्यातील एक वेगळा पैलू पाहायला मिळाला. पवार कुटुंबात ‘ऑल इज वेल’ असल्याचा संदेश या फोटोमधून देण्याचा प्रयत्न झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2019 3:46 pm

Web Title: ajit pawar likely to get back key ncp post dmp 82
Next Stories
1 अजित पवारांवर विश्वास का ठेवला?; अमित शाहांनी दिलं उत्तर
2 सहा नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; पाच महिला नक्षलींचा समावेश
3 चिदंबरम यांनी ‘तिहार’मधून दिला महाविकास आघाडीला महत्वाचा सल्ला; म्हणाले…
Just Now!
X