‘छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि आईवडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..’ अशा शब्दांत ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर रंगलेला सत्तेच्या सापशिडीचा खेळ संपला. राज्यात अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना ट्विटवरुन अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या. महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वोसर्वा आनंद महिंद्रा यांनीही ट्विटवरुन अगदी खास शैलीमध्ये उद्धव यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शुभेच्छा दिल्या.
आनंद महिंद्रा हे ट्विटरवर कायमच अॅक्टीव्ह असतात. दैनंदिन घडामोडींवर ते अनेकदा ट्विटरवरुन भाष्य करताना दिसतात. काल उद्धव यांनी मुख्यमंत्र्याची शपथ घेतल्यानंतर त्यांनी उद्धव यांचे औपचारिक ट्विटर हॅण्डल टॅग करत शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देताना त्यांनी एक जुनी आठवण सांगितली. “उद्धव ठाकरे तुमचे अभिनंदन. आज तुमचे वडील स्वर्गामधून नक्कीच तुमच्याकडे अभिमानाने पाहत असतील. मला आजही आपली तरुणपणातील पहिली भेट आठवतेय. अर्थात आपण दोघांनाही कला श्रेत्रामध्ये करियर न करण्याचा निर्णय घेतला. मला आशा आहे की तुम्ही तुमच्यातील कलात्मक दृष्टीने महाराष्ट्र राज्याला पुढे घेऊन जाल,” असं ट्विट महिंद्रा यांनी केलं आहे.
Congratulations @uddhavthackeray Your father must be looking down with pride from above. I remember first meeting you when we were young & we both had given up the option of artistic careers. I hope you’ll use your creative talents to take the great state of Maharashtra forward..
— anand mahindra (@anandmahindra) November 28, 2019
उद्धव यांच्या शपथविधी सोहळ्याला उद्योगपती मुकेश अंबानी आणि अनंत अंबानीही उपस्थित होते. उद्धव यांच्या शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही उद्धव यांना ट्विटवरुन शुभेच्छा दिल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2019 4:05 pm