News Flash

मतदानाविषयी विद्यार्थ्यांकडून जनजागृती

मतदान जनजागृतीविषयक संदेश असलेल्या आपटय़ांच्या पानांचे वाटप करुन विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी आवर्जुन मतदान करावे

आपटय़ाच्या पानांवर मतदान जनजागृती घोषणा

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर इंदिरानगर येथील सुखदेव प्राथमिक मराठी विद्यामंदिरातील कब बुलबुलच्या विद्यार्थ्यांनी विजयादशमीचे औजित्य साधत मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता जनजागृतीसाठी आपटय़ाच्या पानांचा उपयोग करून घेतला आहे.

मतदान जनजागृतीविषयक संदेश असलेल्या आपटय़ांच्या पानांचे वाटप करुन विधानसभा निवडणुकीत नागरिकांनी आवर्जुन मतदान करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणुन शासनस्तरावर तसेच सामाजिक संस्थांकडून वेगवेगळे उपRम राबविले जात असून त्याचाच एक भाग म्हणून शाळेमार्फत हा उपRम राबविण्यात आला. वृध्द असो वा जवान-अवश्य करा मतदान, लोकशाहीची शान-तुमचे एक मतदान, आद्य कर्तव्य भारतीयांचे-पवित्र कार्य मतदानाचे, निर्भय होऊन मतदान-मताधिकाराचा सन्मान, उंगली पर काला निशान-समझदार नागरिक की पहचान, आन बान और शान से-सरकार बनती मतदान से, डरने की क्या बात है-जब पुलिस प्रशासन साथ है, प्रजातंत्र से नाता हैं- हम भारत के मतदाता है, अशी घोषवाक्ये आपटयाच्या पानांवर लिहून देशाची लोकशाही परंपरा मजबूत करण्यासाठी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता तसेच धर्म, जात, समाज, भाषा यांचा प्रभाव पडु न देता नक्की मतदान करा, असा आग्रह नागरिकांना केला जात आहे.

शाळेचे मुख्याध्यापक नितीन पाटील यांच्या संकल्पनेतून शाळेतील शिक्षकवृंदाने हा उपक्रम राबविला. या अनोख्या उपक्रमाचे संस्थेचे सरचिटणीस संजय काळे यांनी कौतुक केले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 12:52 am

Web Title: awareness students voting akp 94
Next Stories
1 अंदाधुंद गोळीबाराने भुसावळ हादरले; भाजपाच्या नगरसेवकासह पाच ठार
2 नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ
3 कोथरूडप्रमाणे नाशिकमध्ये संयुक्त उमेदवार?
Just Now!
X