News Flash

युतीच्या तिढ्यात बीडच्या तरुणाची उडी; राज्यपालांना म्हणाला…तोपर्यंत मला मुख्यमंत्री करा

मुख्यमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाल्यानं राज्यातील शेतकरी वर्ग आणि सर्वसामान्य चिंतेत आहेत.

निवडणुकीचे निकाल लागून आता आठवड्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यातच सत्तावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. अशातच एका तरूणानं आता अनोखी मागणी केली आहे. मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटत नाही तोवर मुख्यमंत्रिपदाचा पदभार माझ्याकडे सोपवा अशी मागणी बीडच्या एका तरूणानं राज्यपालांकडे केली आहे. श्रीकांत गदळे असं या तुरूणाचं नाव आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांना १०५ जागांवर विजय मिळाला. तर शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. शिवसेना भाजपानं युतीत निवडणूक लढवली असली तरी सत्तेचं वाटप आणि मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांमध्ये एकमत होताना दिसत नाही. अशातच बीडच्या श्रीकांत गदळे या तरूणानं मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटेस्तोवर पदभार आपल्याकडे सोपवण्यात यावा अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे.


मी शेतकरी कुटुंबातील असून गेल्या १० ते १२ वर्षांपासून राजकरणात आणि समाजकारणात अग्रेसर आहे. तसंच गोरगरीबांच्या प्रश्नावर सातत्त्यानं कामदेखील करत आहे. राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भाजपा आण शिवसेना यांच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाल्यानं राज्यातील शेतकरी वर्ग आणि सर्वसामान्य चिंतेत आहेत. त्यामुळे हा तिढा सुटेस्तोवर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आपल्याकडे सोपवण्यात यावी अशी मागणी गदळे यांनी पत्राद्वारे केली आहे. तसंच आपल्या निवदेनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गानं आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 8:41 am

Web Title: beed young guy writes letter to governor of maharashtra give him charge of cm post maharashtra vidhan sabha election 2019 jud 87
Next Stories
1 ‘सत्ता’बाजारात ‘मटका’ लागण्यासाठी भाजपाची ‘आकड्यां’ची जुळवाजुळव
2 पंतप्रधान मातृ वंदना योजनेला महाराष्ट्रात अल्प प्रतिसाद
3 कोयनेत यंदा धरणक्षमतेच्या तब्बल सव्वादोनपट पाण्याची आवक
Just Now!
X