सातारा येथे आज झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान छत्रपती उदयनराजे यांचे भाषण सुरू असताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजीराव भिडे गरुजी यांचे सभास्थळी आगमन झाले. सभामंडपातील व्हीआयपी कक्षापर्यंत पोलीस बंदोबस्तात ते पोहोचले. यावेळी त्यांनी सभामंडपासह व्यासपीठावरील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. परंतु, काही वेळ निघून गेला, तरी त्यांना सभामंचावर आमंत्रित करण्यात आले नाही किंवा भाषणातही त्यांची दखल घेतली गेली नसल्याचे दिसून आल्याने, पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू असतानाच भिडे गुरूजी यांनी भर सभेतून निघून गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वास्तविक भिडे गुरुजी मागील दहा दिवसांपासून सातारा जिल्ह्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना घेऊन प्रचार करत आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करायचा होता. मात्र, सभेच्या ठिकाणी कोणी योग्य ती दखलच न घेतल्यामुळे ते काहीसे अस्वस्थ झाल्याचे दिसून आले. भिडे गुरुजींच्या या अनपेक्षित कृतीमुळे सभेला उपस्थित असलेल्या सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केल्याचे दिसून आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhide guruji walk out from pm modi program msr
First published on: 17-10-2019 at 21:15 IST