24 January 2020

News Flash

युतीचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांनी १०० टक्के युती होईल असा विश्वास व्यक्त केला आहे

(संग्रहित छायाचित्र)

भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरला नसल्याचं सांगितलं आहे. भाजपाची निवडणूक समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी १०० टक्के युती होईल, मात्र युतीचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही असं सांगितलं आहे. तसंच युतीचा निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच भाजपा आणि शिवेसना युतीची घोषणा होण्याची शक्यता असल्याची सुत्रांची माहिती आहे. २२ सप्टेंबरला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबईत असून यावेळी युतीची घोषणा केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रकांत पाटील यांना मात्र याबाबत अधिकृतपणे काही सांगितलं नाही. युतीची जेव्हा घोषणा होईल तेव्हा सोबत जो कोणी केंद्रीय मंत्री असेल ते पत्रकार परिषदेत असतील असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान शिवसेना-भाजपामध्ये १२६-१६२ जागांचा फॉर्म्युला ठरला असल्याचंही सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. शिवसेना १२६ जागांवर लढणार असून, भाजपा आणि मित्रपक्षांसाठी १६२ जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे.

शिवसेना भवनवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीसंबंधी चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. शिवेसनेचे सचिव अनिल देसाई यांनी १०० टक्के युती होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना अनिल देसाई यांनी निवडणुकीच्या तयारीचा पूर्वभाग म्हणून बैठक बोलावण्यात आली असल्याचं सांगितलं. यावेळी अनिल देसाई यांनी समाधानी असल्याशिवाय पुढे जाणार नाही असंही स्पष्ट केलं आहे.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात चर्चा होऊन युतीचा निर्णय घेतला जाईल. सध्या किती जागा लढणार आहोत यासंबंधी आपण सांगू शकत नाही. सध्या अंतिम चर्चा सुरु आहे. चर्चा सकारात्मक सुरु असून युती होईल. पण समाधानी असल्याशिवाय पुढे जाणार नाही,” असं अनिल देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. रविवारी अमित शाह यांच्या मुबंई दौऱ्यात किंवा त्याअगोदर युतीची घोषणा होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

First Published on September 20, 2019 2:16 pm

Web Title: bjp chandrakant patil on alliance with shivsena uddhav thackeray maharashtra assembly election sgy 87
Next Stories
1 चंद्रकांत पाटील निवडणुकीत उतरले तर त्यांच्याविरोधात निवडणूक लढणार, राजू शेट्टींनी थोपटले दंड
2 शिवसेना-भाजपा युतीचा फॉर्म्युला ठरला, १२६ जागा लढण्याची शिवसेनेची तयारी – सूत्र
3 सांगलीत मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांचा हल्ला, २५ मेंढ्या मृत्यूमुखी
Just Now!
X