News Flash

शिवसेना आमदाराला भाजपाकडून ५० कोटींची ऑफर : विजय वडेट्टीवार

काँग्रेस आमदारांनाही ऑफर देण्यात आल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे

शिवसेना आमदाराला भाजपाने ५० कोटीची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. भाजपा आता घोडेबाजार चालवत आहे असंही त्यांनी म्हटलं. फक्त शिवसेनेच्याच तर आमच्याही म्हणजेच काँग्रेस पक्षाच्या आमदारालाही ऑफर देण्यात आली असाही आरोप त्यांनी केला आहे. मात्र हिरामण खोसकर या काँग्रेस आमदाराने मला कोणतीही ऑफर आली नाही असं म्हणत विजय वडेट्टीवार यांचा दावा फेटाळला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना आमदाराला ५० कोटींची ऑफर भाजपाने दिली असं वक्तव्य केलं केलं आहे.

आमचे आमदार फुटणार नाहीत याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. निवडणुकीच्यापूर्वी भाजपाने फोडाफोडी केली मात्र जनतेने हे सहन केले नाही. भाजपा जनतेशी बेईमानी करते आहे. भाजपाला महाराष्ट्र माफ करणार नाही. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात आली तर ते पाप भाजपाचं असेल यात काहीही शंका नाही असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. भाजपाने एकदा समोर येऊन सांगावं की आम्ही सत्ता स्थापन करु शकत नाही. दुसऱ्यांना संधी द्या. स्वतः सरकार स्थापन करायचं नाही आणि दुसऱ्याला संधी द्यायची नाही. भाजपाकडून राष्ट्रपती राजवट आणण्याचा डाव सुरु आहे असाही आरोप वडेट्टीवार यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2019 11:42 am

Web Title: bjp gave 50 crore offer to shivsena mla says vijay vaddettivar scj 81
Next Stories
1 भाजपा-शिवसेनेत कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही – संजय राऊत
2 राज्यातील शेतकरी सुखी व्हावा; चंद्रकांत पाटील यांचे विठ्ठल चरणी साकडे
3 कार्तिकी एकादशीच्या दिवशीच पंढरपूरमध्ये अपघात, ५ वारकरी जागीच ठार
Just Now!
X