News Flash

कालिदास कोळंबकर यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती

भाजपा आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपा आमदार कालिदास कोळंबकर यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राजभवनात त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. राज्यपालांकडून हंगामी अध्यक्षांची निवड करण्यात येते. त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली आहे. हंगामी अध्यक्षपदाच्या शर्यतीत बाळासाहेब थोरात, बबनराव पाचपुते, राधाकृष्ण विखे पाटील, के सी पाडवी, दिलीप वळसे पाटील यांचीही नावं होती.

याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सर्वाधिक आठ वेळा मी निवडून आल्याने विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी माझी निवड व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. हंगामी अध्यक्षपदासाठी सभागृहाचा जो सर्वांत वरिष्ठ सदस्य असतो त्याची परंपरेनुसार निवड केली जाते याचे पालन राज्यपाल करतील अशी आशा आहे, असंही थोरात यांनी सांगितलं होतं.

नव्या विधानसभेत सलग आठ वेळा निवडून आलेले काँग्रेसचे विजय ऊर्फ बाळासाहेब थोरात हे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यापाठोपाठ भाजपमधील बबनराव पाचपुते आणि त्यानंतर कालिदास कोळंबकर यांचा ज्येष्ठताक्रम लागतो. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून सर्वात ज्येष्ठ सदस्याची नियुक्ती राज्यपालांनाकडू केली जाते.

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष निवडण्यासाठी विधान मंडळाकडून ज्येष्ठ सदस्यांची यादी संसदीय कार्यविभागाला दिली जाते. त्या विभागाकडून राज्यपालांकडे यादी पाठविली जाते. संबंधित सदस्याची संमती घेऊन राज्यपालांकडून हंगामी अध्यक्षाची निवड केली जाते. नवनिर्वाचित सदस्यांना शपथ व कायमस्वरूपी अध्यक्षांच्या निवडीसाठी तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले जाते. दोन दिवस शपथविधी पार पडतात आणि तिसऱ्या दिवशी अध्यक्षाची निवड केली जाते. त्यानंतर हंगामी अध्यक्षाचा कालावधी समाप्त होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 5:03 pm

Web Title: bjp kalidas kolambkar pro tem speaker maharashtra assembly political crisis sgy 87
Next Stories
1 देेशभरात चर्चा फक्त अजित पवारांचीच, शरद पवार अन् फडणवीसांनाही टाकलं मागे
2 मातोश्रीबाहेर न पडणाऱ्यांनी इतरांच्या पायऱ्या झिजवल्या- फडणवीस
3 शिवसेना सोनिया गांधींची करत असलेली लाचारी लखलाभ – देवेंद्र फडणवीस
Just Now!
X