27 February 2021

News Flash

“आज बाळासाहेब असते तर त्यांना दु:ख झालं असतं”

बाळासाहेबांनी सर्वांना एकजुट केलं आणि काहींनी सर्वांना वेगळं केलं, याची इतिहास साक्ष देईल.

निवडणुकीचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यातच भाजपा आणि शिवसेनेतील वाद आणखी वाढला आहे. अशातच भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचा एक फोटो ट्विट केला आहे. आज शिवसेनेला हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्या पक्षांसोबतप जात असल्याचं पाहताना बाळासाहेबांना दु:ख झालं असतं, असं ते म्हणाले.

शिवसेनेला हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्या पक्षांसोबतप जात असल्याचं पाहताना बाळासाहेबांना आणि शिवसैनिकांना दु:ख झालं असतं. बाळासाहेबांनी सर्वांना एकजुट केलं आणि काहींनी सर्वांना वेगळं केलं याची इतिहास साक्ष देईल, असं सिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं. शिवसेना आणि भाजपानं युतीमध्ये निवडणुका लढवल्या होत्या. तसंच शिवसेना-भाजपा युतीला बहुमतही मिळालं होतं. परंतु शिवसेना अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि समसमान सत्तावाटपाच्या आपल्या मागणीवर ठाम होती. त्यातच भाजपानं शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर त्यांची युती तुटली.

२४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. १८ दिवसांनंतरही राज्यात अद्याप सरकार स्थापन होऊ शकलं नाही. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसंच यापूर्वीच भाजपानं आपण सरकार स्थापन करू शकणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 9:45 am

Web Title: bjp leader giriraj singh criticize shiv sena remembering balasaheb thackeray maharashtra vidhan sabha election 2019 jud 87
Next Stories
1 बाळासाहेबांना वचन तुम्ही दिलं होतं, शरदराव आणि सोनियांनी नाही!; भाजपाचा उद्धव यांना टोला
2 शिवसेनेची कोंडी झाल्यानंतर नितेश राणेंना हसू आवरेना, म्हणाले…
3 Video : महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने; काय असते राष्ट्रपती राजवट?
Just Now!
X