News Flash

राज ठाकरे हे महाराष्ट्रातले एकमेव ‘कोहिनूर’, भाजपाच्या ‘रम्या’चा टोला

भाजपाच्या रम्याने आता कोहिनूर प्रकरणावर राज ठाकरेंवर टीका केली आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करणारे एक व्यंगचित्र भाजपाने ट्विट केले आहे. रम्याचे डोस या सदरात भाजपाने कोहिनूर मिल प्रकरणावरुन राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘कोट्यधीश जादूगार’ असं शीर्षक देऊन रम्याने डोस दिले आहेत. एक माणूस रम्याकडे येतो तो सांगतो, “अरे काल मी जादूचे प्रयोग बघितले, त्या जादुगाराने २ रुपयांचं नाणं एका रिकाम्या डब्यात ठेवलं आणि दोन सेकंदात त्या नाण्याची २००० रुपयाची नोट दिसली. आम्ही बघतच राहिलो रे” त्यावर रम्या म्हणतो, ” छ्या… त्यात काय मोठं? ह्याला काय जादू म्हनतात होय.. आपल्या कृष्णकुंजवरच्या सायबांनी एकही रुपया टाकला न टाकता २० कोटी काढून दाखवले… ” असं म्हणत भाजपाच्या रम्याने राज ठाकरेंवर टीका केली आहे.

राज ठाकरेंची मनसे विधानसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र राज ठाकरेंना भाजपाने टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. याआधीही ‘राज’मान्य खेळाची सोंगटी कोणत्या चौकटीत? असा प्रश्न विचारुन एक व्यंगचित्र ट्विट करत भाजपाने राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. आता पुन्हा एकदा राज ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे. राज ठाकरे हे महाराष्ट्रातले एकमेव कोहिनूर आहेत हे भाजपाचा रम्या म्हणतोय असंही या व्यंगचित्रात म्हटलं आहे.

विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी भाजपाने ‘रम्याचे डोस’ सुरु केले आहेत. याआधीच्या व्यंगचित्रांमधूनही रम्याने विरोधकांना डोस दिले आहेत. आता राज ठाकरेंवर कोहिनूर प्रकरणावरुन रम्याने निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणातील कोट्यधीश जादूगार असे रम्याने संबोधले आहे. आता भाजपाच्या रम्याला मनसे काही उत्तर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 4:36 pm

Web Title: bjp maharashtra tweets ramyas cartoon against raj thackeray scj 81
Next Stories
1 विधानसभा लढवण्यावरून अशोक चव्हाणांना विनोद तावडे यांनी दिला सल्ला
2 शरद पवार साताऱ्यातून निवडणुकीला उभे राहिले तर माघार घेईन – उदयनराजे
3 पीएमसी बॅंकेवरील आर्थिक निर्बंधांवरून अजित पवारांचा सरकारवर आरोप
Just Now!
X