पिंपरी : प्रचाराच्या निमित्ताने अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांकडून विविध युक्त्यांचा वापर केला जातो. त्याचाच एक भाग म्हणजे, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी मतदार संघात मराठी, गुजराती, हिंदूी, इंग्रजी, संस्कृत अशा देशभरातील २८ भाषांमध्ये प्रचाराचे फलक लावले आहेत. या फलकांद्वारे केलेल्या कामांची माहिती त्यांनी मतदारांना दिली आहे. गुजराती भाषेतील फलकांवरून विरोधकांनी राजकारण सुरू केले असून मनसेने आमदारांचा निषेध केला आहे.

पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेले महेश लांडगे २०१४ मध्ये भोसरीतून अपक्ष निवडून आले. त्यानंतर, त्यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आपल्याला हमखास उमेदवारी मिळेल, असे गृहीत

Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
bacchu kadu, Ramtek,
बच्चू कडूंचा महायुतीवर अमरावतीनंतर रामटेकमध्येही ‘प्रहार’
NCP clock symbol
अरुणाचल प्रदेशसह लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह मिळणार, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा दावा
Narendra Modi
‘चारसौ पार’चा नारा देणारे नरेंद्र मोदी इंडिया आघाडीला घाबरले, अक्कलकोटमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांचा हल्लाबोल

धरून लांडगे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये विशेषत भोसरी मतदार संघात भाजपच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांची माहिती देण्यासाठी त्यांनी जागोजागी प्रचाराचे मोठमोठे फलक लावले आहेत.

हे फलक त्यांनी २८ विविध भाषेत लावले आहेत. गुजराती भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्रांसह लावलेले फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या फलकावरून मनसेने लांडगे यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे-िपपरी चिंचवडसारख्या शहरात मराठीचे वस्त्रहरण करून गुजरातीला नटवण्याचे काम भाजप आमदार करत आहेत, त्याचा मनसेकडून निषेध करण्यात येत असल्याचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी म्हटले आहे. तर, या विषयात राजकारण करण्यासारखे काही नाही, असे लांडगे यांनी स्पष्ट केले आहे.

 

केवळ गुजरातीच नव्हे तर देशभरातील विविध २८ भाषांमध्ये प्रचाराचे फलक लावले आहेत. िपपरी-चिंचवड परिसरात सर्वच प्रांतातून आलेले नागरिक मोठय़ा संख्येने राहतात. ज्या भाषकांची संख्या जास्त असेल, तिथे त्या भाषेचे फलक लावले आहेत. मराठीतील २०० फलक आहेत. या फलकांवरून कोणीही भाषिक राजकारण करण्यासारखे काही नाही.

– महेश लांडगे, आमदार