शिवसेना सोबत येत नाही तर भाजपानं सांगाव की आमच्याकडे संख्याबळ नाही आम्ही सरकार स्थापन करु शकत नाही. भाजपाची ही भुमिका लोकशाहीला आणि घटनेला धरुन नाही. भाजपा सध्या जे करतंय ते घटनाबाह्य आहे. भाजपा काँग्रेस आमदारांना प्रलोभनं दाखवतंय, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले, शिवसेना म्हणतेय ते खर आहे. भाजपाकडून फोडाफोडीच राजकारण होतंय. हे खरंय की भाजपा नेते आमच्या आमदारांना फोन करुन संपर्क करीत आहेत. आमचे ४४ शिलेदार एकाच ठिकाणी आहेत. आज ते संपर्क करीत आहेत उद्या धमकावतील आणि बळजबरी देखील करतील. याची आम्ही राज्यपालांकडे तक्रार करणार आहोत.

भाजपाच्या वेळकाढू पणामुळे जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर त्याला भाजपाच जबाबदार असेल असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.