05 March 2021

News Flash

बाळासाहेबांना वचन तुम्ही दिलं होतं, शरदराव आणि सोनियांनी नाही!; भाजपाचा उद्धव यांना टोला

शिवसेनेची वेळ का चुकली याबद्दलही भाजपाचे 'विश्लेषण'

शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे

“शिवसैनिक मुख्यमंत्री होईल हे वचन तुम्ही (उद्धव ठाकरेंनी) दिले होते शरदराव आणि सोनियांनी नाही,” अशी बोचरी टीका महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी शिवसेनेवर टीका करतान केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी “राष्ट्रवादीच घड्याळ घालुनही वेळ पाळता आली नाही. कारण घड्याळ बिघडलेल होतं,” असा टोलाही शिवसेनेला लगावला आहे. शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी सोमवारी संध्याकाळी साडेसातपर्यंतची वेळ दिली होती. मात्र शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची पत्र साडेसातपर्यंत मिळाली नाही. त्यामुळेच राज्यपालांनी आता विधानसभेमध्ये निवडून आलेला तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणजेच राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे. आज रात्री आठ वाजेपर्यंत राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचा दाव करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.

सोमवारी दिवसभर राज्यामध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. रविवारी भाजपाने शिवसेना सोबत नसल्याचे सत्ता स्थापनेस असमर्थता दर्शवली. त्यानंतर शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी सोमवारी संध्याकाळपर्यंतचा वेळ देण्यात आला होता. मात्र दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या बैठका आणि काँग्रेसच्या भूमिकेची वाट पाहण्याची राष्ट्रवादीने भूमिका घेतल्याने शिवसेनेची गोची झाली आणि त्यांना केवळ सत्तास्थापनेचा दावा करता आला मात्र बहुमतासाठी लागणारी दोन्ही पक्षांची पाठिंबा पत्रे त्यांना सादर करता आली नाहीत. राज्यपालांनी शिवसेनेला वेळ वाढवून देण्यास नकार दिला. “आमचा सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांनी मान्य केला आहे,” अशी प्रतिक्रिया युवासेना नेता आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. मात्र या नंतर समाजमाध्यमांवरुन अनेकांनी शिवसेनेवर टीका केली. यामध्ये भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनीही ट्विटरवरुन शिवसेनेवर निशाणा साधला.

वाघ त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही नाव न घेता टीका केली आहे. ‘शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल असे वचन मी माझ्या वडीलांना दिले होते,’ असं वक्तव्य उद्धव यांनी केलं होतं. शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही त्यावरुनच वाघ यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. “तुम्ही भले वचन दिले असेल, शरदराव व सोनियांनी थोडच वचन दिलय,” असं ट्विट त्यांनी केलं आहे.

घड्याळ बिघडलेलं असल्याने शिवसेनेची वेळ चुकली असाही टोला वाघ यांनी ट्विटवरुन लगावला आहे.

वाघ यांनी सोमवारी सकाळपासूनच ट्वीटरवरुन शिवसेनेवर टीकेची झोड उठवली होती. आदित्य ठाकरेंची काँग्रेसविरोधी जुने ट्विटस, सामना वृत्तपत्राचे जुने काँग्रेसविरोधी मथळे, अजित पवार यांच्याविरोधात समानामधील अग्रलेख असे अनेक ट्विटस त्यांनी केले होते.

दरम्यान, आज राष्ट्रवादी सत्ता स्थापनेचा दावा करणार की राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 9:23 am

Web Title: bjp spokesperson avadhut wagh slams shivsena uddhav thackeray scsg 91
Next Stories
1 शिवसेनेची कोंडी झाल्यानंतर नितेश राणेंना हसू आवरेना, म्हणाले…
2 Video : महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने; काय असते राष्ट्रपती राजवट?
3 बिंदू चौकात आगळावेगळा लग्नसोहळा, कोल्हापूरकरही झाले अवाक्
Just Now!
X