गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. शनिवारी अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा पार पडून काही दिवस उलटत नाही तोच या दोघांनीही मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये या राजकीय घडामोडींची चर्चा होत आहे. सर्व स्तरांमधून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यामध्ये अभिनेत्री डॉली बिंद्रानेदेखील तिच मत मांडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली.

सध्या राजकीय वर्तुळात ज्या गोष्टी घडत आहेत त्याचा कमी-अधिक परिणाम जनतेवरदेखील होत आहे. त्यामुळेच प्रत्येक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये डॉली बिंद्रानेदेखील तिचं मत मांडत शरद पवार यांचं कौतूक केलं आहे. “शरद पवारजी, कमाल किता आपने”, असं म्हणत डॉलीने शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या ट्विटव्यतिरिक्त अन्य काही ट्विटच्या माध्यमातूनही ती व्यक्त झाली.

Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
Chavadi maharashtra political crisis maharashtra politics news maharashtra politics political chaos in maharashtra
चावडी : राज ठाकरे यांच्याकडे ‘शिवसेने’चे नेतृत्व?
Sharmistha Mukharjee and Arvind Kejriwal arrest
“कर्माची फळं…”, प्रणव मुखर्जींच्या मुलीचा केजरीवालांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “अण्णा हजारे गँग…”

“शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले. खरं तर हा महाराष्ट्राच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस आहे”, असं डॉली म्हणाली. पुढे तिने दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीदेखील एक ट्विट केलं.


अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे डॉलीने “आजच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. त्यांचा आशीर्वाद त्यांच्या कुटुंबियांसोबत असता”, असं ट्विट केलं.