सध्या राज्यभरात प्रचाराची रणधुमाळी सुरु असून उमेदवार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र याचा परिणाम अनेकांच्या तब्येतीवर होताना दिसत आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार असणारे धीरज देशमुख आजारी पडले असून त्यांना लातूरमधील रुग्णालयात करण्यात आलं आहे. धीरज देशमुख यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट शेअर करत यासंबंधी माहिती दिली आहे.

धीरज देशमुख यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “कोणत्याही लहान मोठ्या आजाराकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नसते. मागील दोन-तीन दिवसांपासून अंगात थोडासा ताप होता. पण प्रचारसभांच्या व्यस्ततेमुळे तब्येतीकडे जरा दुर्लक्षच झाले. शेवटी नाईलाजाने काल लातूरमध्येच दवाखान्यात अॅडमिट व्हावे लागले आहे. हवामानातील सततच्या बदलामुळे सध्या तापीच्या आजाराचे प्रमाण सगळीकडे वाढले आहे”. सध्या आपण उपचार घेत असून आता प्रकृती सुधारते आहे. काळजी करावी असे कांहीं नाही असंही त्यांनी सांगितलं आहे.

Congress accuses the government that more and more families are in debt
अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट! अधिकाधिक कुटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडल्यचा काँग्रेसचा सरकारवर आरोप
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही
eknath shinde
मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही; शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी; ठाणे, पालघर पक्षाकडेच ठेवण्यासाठी आग्रह
Pawar family
पवार कुटुंबीयही कौटुंबिक जिव्हाळ्याचं राजकारण करू शकतात…

यावेळी धीरज देशमुख यांनी कार्यकर्त्यांनाही तब्येतीची काळजी घेण्यास सांगितलं आहे. “माझे जिवाभावाचे कार्यकर्ते, हितचिंतक व आपण सर्वजण माझ्यासाठी प्रचार करत आहात. या दरम्यान आपण देखील तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या शुभेच्छा आणि स्नेहाच्या बळावर मी लवकरच बरा होवून आपणासोबत प्रचारात सहभागी होईन हा विश्वास मला आहे,” असं धीरज देशमुख यांनी सांगितलं आहे.