News Flash

काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार? महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सोनिया गांधींच्या निवासस्थानी

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना महाराष्ट्रातील काँग्रेस नेते १० जनपथवर सोनिया गांधींच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना महाराष्ट्रातील काँग्रेस नेते १० जनपथवर सोनिया गांधींच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. सोनिया गांधींसोबत होणाऱ्या या बैठकीत महाराष्ट्रासंदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रीपद आणि खातेवाटपावरुन शिवसेना-भाजपामध्ये अद्याप एकमत झालेले नसून दोन्ही पक्षांची परस्परांवर कुरघोडी सुरु आहे.

आजच शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. सहाजिकच त्यासाठी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज लागेल. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला साथ देणार का? हा महत्वाचा मुद्दा आहे.

बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे हे काँग्रेस नेते सोनिया गांधीच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. राज्यातील काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी कोणाची निवड करायची यावरही चर्चा होईल. काँग्रेसला यंदा ४४ जागा मिळाल्या आहेत.

काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. काँग्रेसने शिवसेनेसोबत मुळीच जाऊ नये अशी भूमिका सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली आहे. सुशीलकुमाऱ शिंदे हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याच्या भूमिकेला कडाडून विरोध दर्शवला आहे. जनमत मान्य करुन काँग्रेसने विरोधात बसावं असंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि शिवसेनेची विचारधारा या दोहोंमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 6:31 pm

Web Title: congress maharashtra leaders in delhi to meet congress president sonia gandhi dmp 82
Next Stories
1 अयोध्या खटला : निकाल काहीही लागो शांतता राखा; हिंदू-मुस्लीमांचं आवाहन
2 प्रियकराबरोबरच्या शरीरसंबंंधांची वाच्यता नको म्हणून तिने केली आईची हत्या
3 झारखंडमध्ये 30 नोव्हेंबरपासून पाच टप्प्यात निवडणुका; 23 डिसेंबर रोजी निकाल
Just Now!
X