काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची रद्द झालेली भेट पुन्हा ठरली आहे. संध्याकाळी काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे आणि अहमद पटेल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. यापूर्वी ही भेट रद्द झाल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु आता पुन्हा ही भेट होणार आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची रद्द झालेली भेट पुन्हा ठरली आहे. तसंच फोटाफोडीच्या भीतीपोटी जयपूरमध्ये असलेले काँग्रेसचे आमदारही मुंबईत परतणार आहेत. भाजपानं सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. परंतु शिवसेनेला आमदारांच्या समर्थनाचं पत्र सादर करता आलं नसल्यानं राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे.

यानंतर शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून दोन्ही काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकले होते. एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रानं काहीही झालं नसतं. आम्हीदेखील काँग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढल्यानं दोघांनीही एकत्र हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. काँग्रेसचे आमदार सध्या जयपूरला असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यात अडचण येत आहे. काँग्रेस सोबत आली तरच यातून काही मार्ग निघू शकतो, असं पवार यावेळी म्हणाले.

तर दसुरीकडे शरद पवार यांच्या सांगण्यामुळेच एक दिवस पुढे ढकलला असल्याची प्रतिक्रिया माणिकराव ठाकरे यांनी दिली. २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. १८ दिवसांनंतरही राज्यात अद्याप सरकार स्थापन होऊ शकलं नाही. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसंच यापूर्वीच भाजपानं आपण सरकार स्थापन करू शकणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.