सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक आक्षेपार्ह मजकुराद्वारे आचारसंहितेचा भंग करण्यात येत आहे, असे चंद्रपुरात पोलीस विभागाच्या निदर्शनास आले. उमेदवारांचे सर्व सोशल मीडियावर अकाउंट यासाठी तपासले जात आहे याशिवाय निवडणूक काळात अपप्रचार करणाऱ्या १७ Whats App ग्रुप तसेच त्या ग्रुपमधील सदस्यांना कलम १४९ अन्वये नोटीस बजावण्यात आली.

फेसबुक वरील ‘गॅंग ऑफ चंद्रपूर’ या प्रोफाईलवर काही आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्या. या प्रोफाइल संबंधित असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून अनेक बंधने घातली गेली आहेत. मात्सोर शल मीडियाच्या माध्यमातून अनेक आक्षेपार्ह पोस्ट Whats App, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब यावर शेअर केल्या जात आहेत. अशा पोस्ट द्वारे सामाजिक वातावरण बिघडण्याची दाट शक्यता असल्याने पोलीस विभागाच्या सायबर सेलने ही कारवाई केली आहे.