विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईन…’; हा ‘डॉयलॉग’ विधानसभेत पुन्हा गाजला. जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर अभिनंदन करताना म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की ‘मी पुन्हा येईन..’. ते आले पण कोणत्या बाकावर बसणार हे त्यांनी सांगितले नव्हते. आता ते विरोधी बाकावर बसले आहेत. त्यांच्या या चर्चेनंतर मी पुन्हा येईन या वाक्याची चर्चा जोरात रंगली.

अभिनंदनीय भाषणांना उत्तर देताना आणि विरोधी पक्षनेते म्हणून यावेळचे पहिले भाषण करताना त्यांनी आपल्या त्या वाक्याचे समर्थन केले. ते म्हणाले, ”हे खरं आहे की मी म्हटलं होतं, मी पुन्हा येईन. मी कुठे नाही म्हटलं. अशा गोष्टी लोकशाहीमध्ये होत असतात. महाराष्ट्राच्या जनतेने मला पुन्हा आणलं. १०५ आमदार निवडून दिले आहेत. जनतेचीच इच्छा होती. जनादेश तोच होता. जनादेशाचा सन्मान आम्ही ठेऊ शकलो नाहीत. ही गोष्ट वेगळी आहे. मी आता अशी त्यात सुधारणा करतो की मी, तेव्हा टाईमटेबल सांगितला नव्हता. मी पुन्हा येईन, म्हणालो होतो. टाईम सांगितला नव्हता. त्यामुळे वाट बघा.”

Ajit Pawar, Rahul Gandhi,
अजित पवारांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान : म्हणाले, “राहुल गांधींचे ‘खटाखट’, तर माझे ‘कचाकचा’…”
Election Commission guidelines about Rahul Gandhi Abhishek Banerjee choppers searches
“राहुल गांधींचं हेलिकॉप्टर तपासता, मग मोदींचं का नाही?”, काय आहेत नियम…
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”
Raj Thackeray Uddhav Thackeray
आगामी काळात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? संजय राऊत म्हणाले, “दोन्ही भाऊ एकत्रच आहेत, फक्त…”

त्यानंतर त्यांनी पुढील शेर ऐकवून ‘मी पुन्हा येईन’ या आपल्या वाक्याचे समर्थन केले.

”मेरा पानी उतरता देख
किनारे पर घर मत बना लेना
मैं समंदर हूं
लौटकर जरूर आऊंगा”

 

या ओळींनंतर भाजपाच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. भाषण संपवताना फडणवीस म्हणाले की, ”भुजबळ साहेब इतकं घाबरू नका. पुन्हा आलो तर तुमच्या सकट येतो. आता राजकारणात काहीही अशक्य राहिलेले नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आलात, त्यानंतर अशक्य असं काहीही राहिलेलं नाही.”

 

उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस म्हणाले…
“उद्धव ठाकरे यांचं मी अभिनंदन करतो. उद्धव ठाकरे यांच्याशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध. काही कारणानं ते दुरावले. पण, तरीही मी मुख्यमंत्र्यांना आश्वासन देतो की, कधीही आवाज द्या. आम्ही नेहमीच सहकार्य करू. जनहिताच्या निर्णयासाठी आम्ही सोबत असू, पण, सरकार जर जनतेच्या आकांक्षाची पूर्तता करत नसेल तर आसूड ओढायला मागे पुढे पाहणार नाही,”