News Flash

Video : राष्ट्रवादीची चर्चा – पाऊस थांबला हे बर झालं, जाताना देवेंद्रला घेऊन गेला हेही बरं झालं

राष्ट्रवादी कोअर कमिटीच्या बैठकी खमंग चर्चा

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली असताना राजकीय पडद्यामागे सत्तास्थापनेची लगबग सुरू आहे. सगळ्याच राजकीय पक्षांच्या बैठकांवर बैठका पार पडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीचीही रविवारी पुण्यात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत काही वेळ चर्चा सुरू होती, ती निवडणुकीनंतर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मीम्सची. कोअर कमिटीतील सगळेच नेते बैठकीत सोशल मीडियातील किस्से ऐकवतानाच एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे.

याबैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पक्षाचे विधिमंडळातील गटनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रवक्ते नवाब मलिक, आमदार धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य हजर होते. या नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपाकडून करण्यात आलेला प्रचार आणि निवडणूक निकालानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेले मीम्स, विनोद, कवितांवर चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे सर्वच नेते आपल्याकडील सोशल मीडियातील किस्से रंगवून सांगताना या व्हिडीओत दिसत आहेत.

बैठकीतील चर्चा ऐकण्यासाठी येथे क्लिक करा-

“पाऊस थांबला हे बरं झालं, जाताना देवेंद्रंना घेऊन गेला हेही बरं झालं,” यापासून ते ‘टिक-टॉक’वर सुरू झालेले खुमासदार व्हिडीओ, मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन या वाक्यावरून सोशल मीडियावर उडवली जाणारी खिल्ली इथपर्यंत खमंग चर्चा काही काळ बैठकीत रंगली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 6:46 pm

Web Title: discussion on social media trend after election result in ncp core committee meeting bmh 90
Next Stories
1 …तोपर्यंत गोड बातमी येणार नाही : अजित पवार
2 ऊस दरासाठीची साखर कारखानदार, ‘स्वाभिमानी’तली पहिली बैठक निष्फळ
3 मी पुन्हा येईन… फडणवीसांना बघताच शिवसैनिकांची घोषणाबाजी