News Flash

निवडणुकांच बिगुल वाजलं, महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान, 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार

महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

राज्याच्या तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. आजपासून महाराष्ट्र आणि हरियाणात आचारंसहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर करण्यात येतील. त्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी नवं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

2014 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांवेळी 12 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली होती. तसंच 15 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले होती.

कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम ?

निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याची तारीख – २७ सप्टेंबर

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख – ४ ऑक्टोबर

अर्जांची छाननी – ५ ऑक्टोबर

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत – ७ ऑक्टोबर

मतदान – २१ ऑक्टोबर

मतमोजणी – २४ ऑक्टोबर

Live Blog
13:12 (IST)21 Sep 2019
अर्जाचा रकाना रिकामा राहिल्यास अर्ज बाद - निवडणूक आयोग

निवडणुकीला उभ्या राहिलेल्या उमेदवारांना आपल्या अर्जातील सर्व रकाने भरावे लागणार आहेत. अर्जातील एकही रकामा रिकामा राहिल्यास त्यांच्या अर्ज बाद होईल. तसंच प्रत्येक उमेदवाराला आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही माहिती द्यावी लागणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.

12:57 (IST)21 Sep 2019
दिल्लीतील भाजपा मुख्यालयात अमित शाहंच्या नेतृत्वाखाली बैठक

भाजापाच्या दिल्लीतील कार्यालयात अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरूवात. निवडणुकांची तारीख जाहीर होताच बैठकीला सुरूवात. हरियाणा आणि महाराष्ट्र ही दोन महत्त्वाची राज्य असल्यामुळे आगामी रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे.

12:55 (IST)21 Sep 2019
बंडखोरीची शक्यता नाही - चंद्रकांत पाटील

युती झाली तर बंडखोरीची शक्यता नाही. भजापा शिवसेनेची संघटनात्मक नेटवर्क मोठं आहे. त्यामुळे नाराज होतील. पण त्यांना संमजावण्याचा प्रयत्न करण्यात येऊ शकतो. उदयनराे हे भाजपात आले आहेत. ते नक्कीच भाजापाच्या विजयासाठी प्रयत्न करतील. साताऱ्याची पोटनिवडणूक विधानसभेसोबत होणार नसली तरी त्यातही भाजपाच विजयही होईल असा विश्वास असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

12:51 (IST)21 Sep 2019
साताऱ्याची पोटनिवडणूक लांबणीवर

साताऱ्याची पोटनिवडणूक आता लांबणीवर गेली आहे. साताऱ्याची पोटनिवडणूक महाराष्ट्राच्या विधानसभेसोबत जाहीर करण्यात आली नाही.

12:47 (IST)21 Sep 2019
दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात युतीची दिवाळी साजरी होणार - संजय राऊत

आगामी एक दोन दिवसात युती होणार. महाराष्ट्रातल्या सर्व मतदारसंघात शिवसेनेचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात युतीची दिवाळी साजरी होईल, असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

12:39 (IST)21 Sep 2019
27 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर होणार

निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याची तारीख - २७ सप्टेंबर

उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख - ४ ऑक्टोबर 

अर्जांची छाननी - ५ ऑक्टोबर

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत - ७ ऑक्टोबर 

मतदान - २१ ऑक्टोबर

मतमोजणी - २४ ऑक्टोबर 

12:36 (IST)21 Sep 2019
पुन्हा सरकार स्थापन करू हा विश्वास - विनोद तावडे

महाराष्ट्रात भाजपा सरकार येत्या काही दिवसांमध्ये आपण काय केलं आणि आपण काय करणार आहोत हे 8.94 कोटी लोकांपर्यंत पोहोचू. आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचू. आम्ही 220 पारचं लक्ष्य ठेवून आहोत. विरोधकांनी शत्र टाकलंय. हा आकडा पुढे जाईल. जनतेचे आशीर्वाद महत्त्वाचं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा सरकार स्थापन करू असा विश्वास असल्याचं विनोद तावडे म्हणाले.

12:31 (IST)21 Sep 2019
दिवाळीपूर्वी नवं सरकार स्थापन होणार?

विधानसभा निवडणुकीचे निकाल 24 ऑक्टोबर (गुरूवार) रोजी जाहीर होणार असून दिवाळीपूर्वी नवं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 

12:24 (IST)21 Sep 2019
21 ऑक्टोबर महाराष्ट्रात रोजी मतदान

21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये मतदान होणार. 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार.

https://platform.twitter.com/widgets.js

12:21 (IST)21 Sep 2019
पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी पथक

निवडणुकीत पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच उमेदवारांना आपल्या गुन्हेगारीची माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. 28 लाखांपेक्षा अधिक खर्च करण्याची परवानगी नाही.

12:12 (IST)21 Sep 2019
महाराष्ट्र आणि हरियाणात आचारसंहिता लागू

महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात 1.8 लाख इव्हिएमचा वापर होणार आहे. तर महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

https://platform.twitter.com/widgets.js

11:35 (IST)21 Sep 2019
2014 च्या विधानसभा निवडणुकीत पटकावलेल्या विभागवार जागा

पश्चिम महाराष्ट्र (70) – भाजपा 24, शिवसेना 13, काँगेस 10, राष्ट्रवादी काँग्रेस 19, इतर 04

विदर्भ (62) – भाजपा 44, शिवसेना 04, काँगेस 10, राष्ट्रवादी काँग्रेस 01, इतर 03

मराठवाडा (46) – भाजपा 15, शिवसेना 11, काँगेस 09, राष्ट्रवादी काँग्रेस 08, इतर 03

कोकण (39) – भाजपा 10, शिवसेना 14, काँगेस 01, राष्ट्रवादी काँग्रेस 08, इतर 06

मुंबई (36) – भाजपा 15, शिवसेना 14, काँगेस 05, राष्ट्रवादी काँग्रेस 00, इतर 02

उत्तर महाराष्ट्र (35) – भाजपा 14, शिवसेना 07, काँगेस 07, राष्ट्रवादी काँग्रेस 05, इतर 02

एकूण (288) – भाजपा 122, शिवसेना 63, काँगेस 42, राष्ट्रवादी काँग्रेस 41, इतर 20

11:25 (IST)21 Sep 2019
आचारसंहितेने सरकारला लावले कामाला; चार दिवसांत घेतले ४७१ निर्णय
https://platform.twitter.com/widgets.js
11:22 (IST)21 Sep 2019
लोकसभा निवडणुकीच्या वेळीच विधानसभेचाही फॉर्म्युला ठरला - उद्धव ठाकरे

लोकसभेच्या वेळीच विधानसभेचा फॉर्म्युला ठरला असून लवकरात लवकर तो जाहीर करु अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसंच लवकरात लवकर आपण उमेदवारांची घोषणा करु असंही त्यांनी सांगितलं आहे...

https://platform.twitter.com/widgets.js

10:52 (IST)21 Sep 2019
गेल्या विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा?

2014 मध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या ?भाजपा - १२२ शिवसेना - ६३ काँग्रेस - ४२ राष्ट्रवादी काँग्रेस - ४१

10:27 (IST)21 Sep 2019
काँग्रेस राष्ट्रवादीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा 125-125 तर मित्रपक्षांना 38 जागा देण्याचा फॉर्म्युला ठरला आहे. मात्र, यावर मित्रपक्ष नाराज असल्याचे म्हटलं जात आहे. मित्रपक्षांकडून 55 ते 60 जागांची मागणी करण्यात येत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.

10:11 (IST)21 Sep 2019
9 नोव्हेंबर रोजी विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होणार

2014 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांवेळी 12 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू करणअयात आली होती. तसंच 15 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर 19 ऑक्टोबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले होती. परंतु यावेळी 20सप्टेंबरपर्यंतही निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली नाही. 9 नोव्हेंबर रोजी विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होणार असून आता निवडणुकांच्या तारखांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

10:01 (IST)21 Sep 2019
आज निवडणूक आयोगाची पत्रकार

आज दुपारी 12 वाजता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, आज निवडणूक आयोग महाराष्ट्रातील आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकांची तारीखा जाहीर करणार आहेत. 

https://platform.twitter.com/widgets.js

Next Stories
1 तुम्हाला रम्या माहितीये का ? भाजपा देणार आता ‘रम्याचे डोस’
2 पुणे : UPSC साठी विद्यापीठात विशेष कोर्स, ४० विद्यार्थ्यांची करणार निवड
3 भाजप नेत्यांच्या बडबोलेपणामुळे मोदींच्या राम मंदिराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह – शिवसेना
Just Now!
X