27 September 2020

News Flash

भाजपचा प्रचार राष्ट्रवादाच्या मुद्दय़ावर केंद्रीत

कथितरीत्या भ्रष्टाचारात गुंतलेल्या विरोधी पक्षनेत्यांसह अनेक बडय़ा व्यक्तींविरुद्ध सुरू झालेल्या कारवाईचेही लोकांनी स्वागत केले आहे

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र आणि हरयाणा या राज्यांमध्ये भाजपच्या प्रचारात अनुच्छेद ३७० रद्द करणे, मोदी सरकारची भ्रष्टाचारविरोधी मोहीम आणि देशव्यापी राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा (एनआरसी) पाठपुरावा या मुद्दय़ांना प्रचारात प्राधान्य दिले जाईल, असे पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात सुमारे १०, तर हरयाणात ४ ते ५ प्रचारसभा घेतील आणि पक्षाध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा हे या दोन्ही राज्यांमध्ये पंतप्रधानांपेक्षा दुप्पट प्रचारसभा घेणार आहेत.  या दोन नेत्यांच्या प्रचारसभांची संख्या आवश्यकतेनुसार ती बदलू शकते, असे एका पक्षनेत्याने सांगितले.

कथितरीत्या भ्रष्टाचारात गुंतलेल्या विरोधी पक्षनेत्यांसह अनेक बडय़ा व्यक्तींविरुद्ध सुरू झालेल्या कारवाईचेही लोकांनी स्वागत केले आहे, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2019 12:44 am

Web Title: emphasis on nationalism in bjp propaganda abn 97
Next Stories
1 काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत- जावडेकर 
2 आरेप्रकरणी विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांना लिहिले पत्र; उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी
3 अब्दुल्ला पिता-पुत्रांची नजरकैद तात्पुरती शिथिल; पक्षातील नेत्यांच्या झाल्या भेटी
Just Now!
X